पोलीस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – पोलीस दलात कार्यरत असणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. अण्णा गुंजाळ असे आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. लोणावळ्यातील टायगर पॉईंट येथील शिवलिंग पॉईंट या ठिकाणी त्यांनी गळफास घेतला. आत्महत्येमागील कारण समजले नाही.

संपादकीय भूमिका :

मानसिक खंबीरतेसाठी शांतता, स्थिरता यांसह साधनेचा पाया असणे आवश्यक आहे.