झाशी (उत्तरप्रदेश) – येथे एका महिलेने मासिक पाळीमुळे चैत्र नवरात्रीत ९ दिवसांचे उपवास करू न शकल्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. प्रियांशा सोनी (वय ३६ वर्षे) असे या महिले नाव असून ती पती मुकेश सोनी आणि २ लहान मुलींसमवेत रहात होती. सध्या पोलीस या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत.
पती मुकेश यांनी सांगितले की, पत्नी नवरात्रीच्या सणाविषयी फार उत्साहित होती. तिने पूजेची सिद्धता आधीच चालू केली होती; पण ज्या दिवशी चैत्र नवरात्रीस प्रारंभ झाली, त्याच दिवशी तिला मासिक पाळी आली. यामुळे ती उपवास करू शकली नाही. मी पत्नीला सतत समजावून सांगत होतो की, हा एक नैसर्गिक योगायोग आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नाही; पण ती अप्रसन्न होती आणि तिला उपवास न करता आल्याचा पश्चात्ताप होत होता. त्यातून तिने घरीच विष प्राशन करून आत्महत्या केली.
संपादकीय भूमिकाहिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याने ते अशा प्रकारची चुकीची कृती करत आहेत. अशा घटनांचा हिंदुविरोधी, नास्तिकतावादी आणि पुरो(अधो)गामी हिंदु धर्मावर टीका करण्याचा वापर करतात ! |