Love Jihad In Hubballi : मुसलमान तरुणाच्या छळाला कंटाळून विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न !

धर्मांध सिराजच्या सततच्या छळाला कंटाळून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

हुब्बळ्ळी (कर्नाटक) : येथे सिराज नावाच्या मुसलमान तरुणाच्या सततच्या छळाला कंटाळून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सिराज तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी तिच्यावर बळजोरी करत होता आणि त्याच्याशी लग्न करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होता. तो तिला धमकावत होता.

सिराज तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी तिच्यावर बळजोरी करत होता

सिराजच्या छळाला वैतागून विद्यार्थिनीने झोपेच्या गोळ्या घेतल्या. त्यामुळे तिची प्रकृती खालावली. कुटुंबियांनी तिला तातडीने रुग्णालयात भरती केले आहे. मुलीचा छळ करणार्‍या सिराजला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

युवतींच्या जिवावर उठलेल्या अशा वासनांध मुसलमानांना आजन्म कारागृहात डांबणे आवश्यक !