भारतीय शास्त्रीय नृत्याचे आध्यात्मिक महत्त्व जाणा !

चित्रकला, संगीत, नृत्य आदी सर्व कलांची निर्मिती ईश्वरापासून झाली आहे. त्यामुळे ईश्वराची अनुभूती घेता येणे, हे या सर्व कलांचे अंतिम साध्य आहे. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने या संदर्भात विपुल संशोधन करण्यात आले आहे.

भयपट पाहिल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म ऊर्जेवर (‘ऑरा’वर) नकारात्मक परिणाम होतात ! – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन

व्यक्तीने भयपट पाहिल्यावर तिच्या सूक्ष्म-ऊर्जेवर होणाऱ्या परिणामासंदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेल्य वैज्ञानिक चाचणीचे निष्कर्ष येथे देत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले लिखित आणि आध्यात्मिक संशोधनावर आधारित शोधनिबंध मार्च २०२४ या मासामध्ये आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर

ऑक्टोबर २०१६ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने २० राष्ट्रीय आणि ९४ आंतरराष्ट्रीय अशा एकूण ११४ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार मिळाले आहेत.

 स्त्रियांनी साडीचा पदर मोकळा सोडण्यापेक्षा तो कंबरेला खोचणे लाभदायी असणे ! – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन

स्त्रियांनी किमान घरात असतांना साडी नेसावी, तसेच घरातील विविध कामे करतांना साडीचा पदर मोकळा न सोडता, तो कंबरेला खोचावा.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार चालू असलेल्या आध्यात्मिक संशोधनाला समाजातून मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येणार्‍या आध्यात्मिक संशोधनावर आधारित विविध विषयांवरील संशोधनात्मक लेख गत ५ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रत्येक रविवारी प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

सात्त्विक वृत्ती असलेले लोक आनंद, स्थिरता आणि शांती यांचा अनुभव घेतात ! – शॉर्न क्लार्क, गोवा

बँकॉक, थायलँड येथे १७ ते १९ मार्च या कालावधीत झालेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन हॅप्पीनेस अँड वेल-बिईंग (ICHW2024)’ या परिषदेत श्री. क्लार्क बोलत असताना त्यांनी ‘सूक्ष्म सकारात्मक स्पंदने आनंदप्राप्तीचाचा शोध कसा सक्षम करतात’, हा शोधनिबंध सादर केला.

संपादकीय : प्रदूषणग्रस्त भारत !

भारतीय संस्कृतीत प्रत्येक गोष्ट, सण, वस्तू या देवत्वाशी जोडल्या आहेत. वटपौर्णिमा असो वा तुळशीविवाह हिंदु संस्कृतीतील प्रत्येक कृती ही निसर्गानुकूल आहे. झाडांना आपण देव मानतो. त्यामुळे त्यांना जपतोही. त्यामुळे पृथ्वीला जर प्रदूषणापासून वाचवायचे असेल, तर आपल्याला अध्यात्माकडेच वळावे लागेल.

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या अंतर्गत ‘हस्त आणि पाद सामुद्रिक शास्त्रा’च्या संदर्भातील संशोधन कार्यात सहभागी होऊन साधनेच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्या !

हस्त-पाद सामुद्रिक शास्त्राद्वारे ‘व्यक्तीला आध्यात्मिक त्रास असल्याचे लक्षात येते का ?’, यासंदर्भात संशोधन करायचे आहे.

Research Yadanya Smoke:हवनाच्या धुराचा जिवाणूंमुळे होणार्‍या आजारांवर होणार्‍या परिणामांवर  संशोधन करणार !

प्राचीन काळी ऋषी-मुनींना याविषयी सखोल ज्ञान होते. आता भारतातही याविषयी संशोधन होत आहे, हे चांगलेच आहे. सरकारनेही अशा संशोधनांना प्रोत्साहन देणे आवश्यक !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत करण्यात आलेल्या ‘श्री दुर्गासप्तशती अनुष्ठाना’तील श्री दुर्गादेवीच्या चित्राच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांचे सर्व शारीरिक त्रास दूर व्हावेत आणि त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, म्हणून त्यांच्या खोलीमध्ये १८ ते २५.१.२०२४ या कालावधीत शाकंभरी नवरात्रीनिमित्त श्री दुर्गासप्तशतीचे पठण केले जात होते. या अनुष्ठानात श्री दुर्गादेवीच्या चित्राची पूजा केली जात होती.