पारंपरिक गरबा नृत्यातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा साधिकेवर झालेला सकारात्मक परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

३ ऑक्टोबर या दिवशी ‘घटस्थापना’ (नवरात्रारंभ) होत आहे. त्या निमित्ताने…

‘नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी कार्यरत असते. ‘गरबा खेळणे, यालाच हिंदु धर्मात टाळ्यांच्या लयबद्ध गजरात देवीचे भक्तीरसपूर्ण गुणगानात्मक भजन करणे’, असे म्हणतात. गरबा खेळणे, म्हणजे टाळ्यांच्या नादात्मक सगुण उपासनेतून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे होय. गुजरातमध्ये मातृशक्तीचे प्रतीक म्हणून नवरात्रात अनेक छिद्रांच्या मातीच्या मडक्यात ठेवलेला दीप किंवा दिवा पूजला जातो. स्त्रीच्या सृजनात्मकतचे प्रतीक म्हणनू ९ दिवस पूजल्या जाणार्‍या ‘दीपगर्भ’ मधल्या ‘दीप’ शब्दाचा लोप होऊन गर्भ-गरभो-गरबो किंवा गरबा असा शब्द प्रचलित झाला. पूर्वी ‘गरबा’ या नृत्याच्या वेळी देवीची, कृष्णलीलेची आणि संतरचित गीतेच म्हटली जात असत.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या साधिका सौ. नीता सोलंकी (वय ५९ वर्षे) यांना बालपणापासून गरबा नृत्याची आवड होती. त्यांच्यामध्ये देवीप्रती उत्कट भाव आहे. त्यांनी विविध प्रकारच्या पारंपरिक गरबा नृत्यांचे शिक्षण घेतले आहे. गत १९ वर्षांपासून त्या पारंपरिक गरबा नृत्य शिकवत आहेत. ‘नृत्य करणार्‍या व्यक्तीवर गरबा नृत्याचा आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

सौ. मधुरा कर्वे

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

सौ. नीता सोलंकी यांनी गरबा नृत्यासाठी घालण्यात येणारे अलंकार आणि पोषाख परिधान करून १० मिनिटे देवीला आवाहन करणारे (टीप) पारंपरिक गरबा नृत्य केले. त्यांच्यावर गरबा नृत्याचा झालेला परिणाम पुढे दिला आहे.

टीप – ‘गरबा खेळणे’ आरंभ करतांना त्यात सर्वप्रथम देवतेचे आवाहन केले जाते. सर्वप्रथम श्री गणपति, त्यानंतर श्री सरस्वतीदेवी आणि श्री महाकालीदेवी अन् त्यानंतर अन्य स्थानिक देवीदेवता यांचे आवाहन करणारे गीत गात त्यावर नृत्य केले जाते. यालाच ‘देवतांचे गरब्याच्या माध्यमातून आवाहन करणे’, असे म्हणतात.

श्री दुर्गादेवीच्या प्रतिमेसमोर पारंपरिक गरबा नृत्य करतांना सौ. नीता सोलंकी

१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन

१ अ १. नृत्यानंतर सौ. नीता सोलंकी यांच्यातील नकारात्मक ऊर्जा न्यून होऊन त्यांच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे : सौ. सोलंकी यांच्यामध्ये आरंभी नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा होती. त्यांनी नृत्यासाठी पोषाख परिधान केल्यानंतर, तसेच नृत्य केल्यानंतर त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा न्यून होऊन त्यांच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

२. निष्कर्ष

पारंपरिक गरबा नृत्याचा सौ. सोलंकी त्यांच्यावर सकारात्मक परिणाम झाला.

गरबोत्सवातील अनुचित प्रकार रोखून उत्सवाचे पावित्र्य राखा !

‘पूर्वी ‘गरबा’ या नृत्याच्या वेळी देवीची, कृष्णलीलेची आणि संतरचित गीतेच म्हटली जात असत. आज भगवंताच्या या सामूहिक नृत्योपासनेला विकृत स्वरूप आले आहे. ‘रिमिक्स’, पाश्चात्त्य संगीत किंवा चित्रपटगीते यांच्या तालावर अश्लील अंगविक्षेप करत गरब्याच्या नावाखाली ‘डिस्को दांडीया’ खेळला जातो. या वेळी अनैतिकतेला उत्तेजन देणारी उत्तेजक वेशभूषा आणि स्त्री-पुरुषांचे नृत्य, तसेच व्यभिचारही होतो. पूजास्थळी तंबाखूसेवन, मद्यपान, ध्वनीप्रदूषण आदी प्रकारही घडतात. हे अपप्रकार, म्हणजे धर्म आणि संस्कृती यांची हानी ! हे अपप्रकार रोखणे, हे काळानुसार आवश्यक धर्मपालनच आहे.’

(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ ‘देवीपूजनाशी संबंधित कृतींचे शास्त्र’)

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण 

३ अ. सौ. सोलंकी यांनी गरबा नृत्य भावपूर्ण केल्याने त्यांना देवीचे चैतन्य मिळणे : नृत्यातून निर्माण होणार्‍या लयबद्ध नादलहरींमध्ये देवतेला स्पर्श करून तिला जागृत करण्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे नृत्यातून साधना करणार्‍या जिवाला ईश्वरापर्यंत जलद पोचता येते. चाचणीतील गरबा नृत्याच्या प्रयोगात श्री दुर्गादेवीच्या चित्राला फुलांची आरास करून देवीला आवाहन करणारे पारंपरिक गीत लावले होते. त्या गीतावर सौ. सोलंकी यांनी गरबा नृत्य केले. त्यांच्यामध्ये देवीप्रती उत्कट भाव आहे. त्यांनी नृत्याच्या माध्यमातून देवीला भावपूर्ण आवाहन केले. देवीच्या चरणी भावपूर्ण अर्पण केलेल्या नृत्यसेवेमुळे त्यांच्याकडे देवीतत्त्व (देवीचे चैतन्य) आकृष्ट झाले. त्यामुळे त्यांच्यातील नकारात्मक स्पंदने न्यून होऊन त्यांच्यातील सकारात्मक स्पंदनांमध्ये वाढ झाली.

३ आ. गरबा नृत्य करतांना सौ. सोलंकी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती : सनातनच्या आश्रमात गरबा नृत्याचा प्रयोग झाल्यानंतर सौ. सोलंकी यांनी सांगितले की, त्यांना समाजात गरबा खेळतांना केवळ १०-१५ टक्के देवतांचे तत्त्व अनुभवायला येते आणि कधीकधी २० टक्केही अनुभवायला आले आहे; परंतु रामनाथी आश्रमात देवतांची अनुभूती सर्वाधिक प्रमाणात, म्हणजे ९५ टक्के आली. येथे ‘प्रत्यक्ष देवताच गरबा नृत्य करत असणे, देवतेसमवेत गरबा खेळत असणे, देवताच माझ्या माध्यमातून गरबा खेळत असणे, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव नसणे, देहभान हरपणे, अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा अनुभवणे, दैवी शक्ती अनुभवणे’, अशा विविध अनुभूती आल्या.

थोडक्यात ‘नृत्य करणार्‍या व्यक्तीमध्ये देवतेप्रती भाव असणे आणि तिने नृत्य ‘साधना’ म्हणून केल्यास तिला नृत्यातून आध्यात्मिक लाभ होतात’, हे लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

इ-मेल : [email protected]

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’ या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक