देशातील ऑक्सिजनचे लेखापरीक्षण आणि त्याच्या पुरवठ्याच्या पद्धतीवर पुन्हा विचार करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला आदेश

देशभरातील ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ऑक्सिजनचे लेखापरीक्षण करण्याची आणि त्याच्या पुरवठ्याच्या पद्धतीवर पुन्हा विचार करण्याचीही आवश्यकता आहे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला.

गुन्हेगारांच्या उदात्तीकरणाचा डाव !

अगोदर केवळ चित्रपट, नाटके यांच्या माध्यमांपुरते मर्यादित असणारे गुंड, गुन्हेगार आणि आर्थिक भ्रष्टाचार करणारे यांचे उदात्तीकरण ‘वेब सिरीज’च्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात होत आहे.

कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील मुख्याधिकार्‍यांकडून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाच्या विसंगत आदेश निर्गमित

कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला विसंगत पत्र सिद्ध करून ते प्रसिद्ध केले आहे. सध्या ते सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून कोरेगावातील विविध प्रसिद्धीगटांमध्ये फिरत आहेत.

ऑक्सिजनच्या अभावी होणारे मृत्यू म्हणजे नरसंहारच ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे लोकांचे प्राण जात आहेत, हे पाहून आम्हाला दुःख होत आहे. हे गुन्हेगारी कृत्य असून ते नरसंहारापेक्षा अल्प नाही, अशी टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी केली.

कोरोनाबाधितांना विनामूल्य रिक्शा सुविधा पुरवण्यासाठी मुंबईतील शिक्षक दत्तात्रय सावंत यांचा पुढाकार !

ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी दत्तात्रय सावंत यांचा सत्कार केला. ‘कोरोनाचे संकट संपेपर्यंत जनसेवेचे हे कार्य चालू ठेवणार आहे’, असे दत्तात्रय सावंत यांनी सांगितले.

पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक सार्वजनिक काका !

पुणे सार्वजनिक सभेचे (स्थापना – २ एप्रिल १८७०) यंदाचे हे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने संस्थेचे संस्थापक श्री. गणेश वासुदेव जोशी उपाख्य सार्वजनिक काका यांच्या कार्याचा हा अल्पसा परिचय !

वाघ वाघासारखे बोलले !

सध्या समाज स्वार्थी आणि आत्मकेंद्रित होत असतांना दाभाडकर यांनी सर्वांसमोर ठेवलेल्या आदर्शाला तोड नाही. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते अवधूत वाघ यांनी ट्वीटद्वारे ‘आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोलकरांचे नाहीत’, असे सांगत स्वतःची भूमिका मांडली.

पुणे विद्यापिठाच्या ‘ऑनलाईन’ परीक्षेतील गोंधळ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या वतीने प्रथम सत्राच्या ‘ऑनलाईन’ परीक्षेकरिता ‘लॉग इन’ होत नसल्याच्या अनुमाने ९ सहस्र तक्रारी परिक्षार्थींनी दाखल केल्या आहेत. ‘लॉग इन’ होत नसल्याने पेपर लिहिता येत नाही.

कोणताही क्यू.आर्. कोड किंवा अनोळखी व्यक्तीने पाठवलेला क्यू.आर्. कोड स्कॅन करू नका !

कोणताही क्यू.आर्. कोड किंवा अनोळखी व्यक्तीने पाठवलेला क्यू.आर्. कोड स्कॅन करू नका, असे आवाहन स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी केले आहे. जर चुकूनही कोड स्कॅन केला, तर बँक खात्यामधील पैसे जाऊ शकतात, असे सांगण्यात आले आहे.

संभाजीनगर येथे कोरोनाग्रस्तांच्या साहाय्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्सची विनामूल्य सेवा !

सध्या कोरोनाचे संकट वाढलेले असतांना शहरातील अनेक नातेवाइकांना विविध सुविधा मिळवण्यात अडचणी येत आहेत.रुग्णालयात जागा मिळवून देणे, अ‍ॅम्ब्युलन्स, प्लाझ्मा डोनेशन, बाहेरून लागणारी औषधे नेऊन देण्याचे काम हा ग्रुप करत आहे.