स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना सतर्कतेचे आवाहन !
नवी देहली – कोणताही क्यू.आर्. कोड किंवा अनोळखी व्यक्तीने पाठवलेला क्यू.आर्. कोड स्कॅन करू नका, असे आवाहन स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी केले आहे. जर चुकूनही कोड स्कॅन केला, तर बँक खात्यामधील पैसे जाऊ शकतात, असे सांगण्यात आले आहे. ‘ऑनलाईन बँकिंग’चा वापर करत असतांना फसवणुकीच्या अनेक तक्रारी आल्याने हे आवाहन करण्यात आले आहे. ‘ऑनलाईन बँकिंग’चा वापर करतांना ग्राहक म्हणून फसवणूक होत आहे किंवा फसवणुकीचा संशय आल्यास थेट बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा आणि त्याविषयी माहिती द्यावी, असे बँकेने म्हटले आहे.
१. स्टेट बँक ऑफ इंडियाने क्यू आर कोडद्वारे कशी फसवणूक होते हे समजावून सांगण्यासाठी एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. ग्राहकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की, आपण ज्यावेळी दुसर्
याचा क्यू आर कोड स्कॅन करतो तो पैसे पाठवण्यासाठी असतो. आपण स्वत: क्यू आर कोड स्कॅन केल्यास पैसे स्वीकारले जात नाहीत तर ते आपल्या खात्यातून जातात, असे बँकेने म्हटले आहे.
ही माहिती देऊ नका !
ग्राहकांनी कुणालाही खाते क्रमांक, पॅन कार्ड माहिती, आयएन्बी प्रमाणपत्रे, भ्रमणभाष क्रमांक, युपीआय पिन, एटीएम कार्ड क्रमांक, एटीएम पिन सांगू नका.