बनासकांठा (गुजरात) येथे गावातील गोशाळेत कोविड सेंटर !

केंद्र सरकारने देशातील आरोग्यव्यवस्थेची स्थिती पहाता अशा प्रकारचे सेंटर सर्वत्र निर्माण करण्यासाठी गोशाळा चालक आणि आयुर्वेदाचे वैद्य यांना अनुमती दिली पाहिजे, असेच यावरून वाटते !

डी.आर्.डी.ओ.चा बोलबाला !

देशात आपत्काळ आल्यावर केवळ स्वतःचे क्षेत्र किंवा काम यांपुरता मर्यादित विचार न करता व्यापक विचार करून कृती कशी करायची ? याचा पायंडा ‘डी.आर्.डी.ओ.’ने घालून दिला आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून व्हेंटिलेटरसाठी ३ कोटी रुपये !

शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कोरोना केंद्र यांना सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ३ कोटी रुपयांचे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. 

पाली (राजस्थान) येथे ऑक्सिजनवर असलेल्या कोरोनाग्रस्त वृद्धेने तरुणासाठी रुग्णालयातील स्वतःची खाट सोडली !

भारतात अजूनही माणूसकी शिल्लक आहे, याचे हे एक उदाहरण ! अशा वृत्तीचे लोक देशात दुर्मिळ झाले आहेत, हेही तितकेच खरे !

हमीरपूर (उत्तरप्रदेश) येथे यमुना नदीमध्ये सापडले अनेक मृतदेह !

प्रशासनाने जनतेमध्ये कोरोना मृतदेहांविषयी जागृती न केल्याचा हा परिणाम आहे ! अशामुळे नदी प्रदूषित होऊन कोरोनाच्या संसर्गात अधिक वाढ होऊ शकते. यामुळे आता शासनाने हे रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलणे आवश्यक !

भारतातील किती उद्योगपती टाटांसारखे दानशूर आहेत ?

‘टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन्. चंद्रशेखरन् यांच्या पुढाकाराने टाटा समूहाने कोरोनाच्या संकटात साहाय्य करण्यासाठी ‘नो लिमिट’ (अमर्यादित) साहाय्याची योजना आखली आहे. टाटा समूह या योजनेसाठी २ सहस्र कोटी रुपये व्यय करणार आहे.

अमेठी (उत्तरप्रदेश) येथील ग्रामपंचायतीत सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर धर्मांधांकडून मिरवणुकीत वाजवले पाकचे गीत !

असे लोकप्रतिनिधी भारताच्या हिताची कामे काय करणार ? भारतात राहून पाकशी एकनिष्ठ असणार्‍या अशा लोकप्रतिनिधींना पाकमध्ये पाठवा !

भारततील कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी इस्रायलमधील ज्यूंकडून प्रार्थना आणि ‘ॐ नमः शिवाय’चा जप !

स्थूल रूपाने अनेक जण नेहमीच साहाय्य करत असतात; मात्र इस्रायलमधील ज्यू धर्मियांनी अशा प्रकारे जप आणि प्रार्थना करून केलेले साहाय्य अनमोल आहे ! यातून तेच भारतियांचे, हिंदूंचे खरे मित्र आहेत, हे स्पष्ट होते !

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कर्नाटकातील नागक्षेत्र कुक्के सुब्रह्मण्य येथे एक सप्ताह धन्वंतरी होम !

दक्षिण भारतातील प्रसिद्ध नागक्षेत्र कुक्के सुब्रह्मण्य येथे कोरोना महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी, तसेच लोककल्याणार्थ विशेष पूजेला प्रारंभ करण्यात आला आहे. ५ मे ते ११ मेपर्यंत एक सप्ताह पूजा, होम-हवन करण्यात येणार आहे.

कोरोनाबाधित तरुणीशी अश्‍लील वर्तन करणार्‍या २ वॉड बॉयची नोकरीवरून हकालपट्टी

कोरोना संकटाच्या काळात अशा प्रकारची कृती करणार्‍यांना आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा केली पाहिजे !