
शेख सल्लाउद्दीन दर्ग्याकडून पोलिसांत तक्रार !
पुणे – भाजप नेत्या आणि राज्यसभा खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी हनुमान जयंतीच्या दिवशी पुण्येश्वर मंदिरात कार्यक्रमासाठी आल्या होत्या. तेव्हा त्यांनी जवळच्या छोटा शेख सल्लाउद्दीन दर्गा येथे नमाजासाठी देण्यात आलेली अजान रोखण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. याविषयीचा एक व्हिडिओही समोर आला आहे. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित दर्गा ट्रस्टकडून याची तक्रार देण्यात आली आहे; मात्र गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.
नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे म्हणाले, ‘‘हा सर्व प्रकार धक्कादायक आणि निंदनीय आहे. हे सूत्र आणि संबंधित परिसर अत्यंत संवेदनशील असून खासदारांनी असे व्यक्त होणे चुकीचे आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवून पुढील कारवाई करावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे.’’
प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी स्थानिक मुसलमान नागरिकांना धक्काबुक्की केल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे; परंतु पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. (या प्रकरणात पोलीस प्रशासनानेही सत्यता पडताळून नेमकी धक्काबुक्की कुणी केली, याचा शोध घ्यावा. तसेच दर्ग्याचीही सर्व कागदपत्रे, तसेच अन्य गोष्टी अधिकृत आहेत ना, याची पडताळणी करावी ! – संपादक)
संपादकीय भूमिकामशिदीतील अजान थांबवल्याप्रकरणी तक्रार करणार्यांनी पुणे जिल्ह्यातील नियमबाह्य किंवा अवैधरित्या अजान देण्याच्या प्रकरणात कधी तक्रार केली आहे का ? अल्पसंख्यांकांविषयी जरा खुट्ट झाल्यावर जागे होणारे पुण्यातील अवैध बांगलादेशी, अवैध घुसखोर, अवैध प्रार्थनास्थळांचे बांधकाम यांवर कधी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या ! |