Vadodara Maulana Filmed Bathing Woman : वडोदरा (गुजरात) येथील मौलानाने बनवला बाथरूममध्ये स्नान करणार्‍या महिलेचा व्हिडिओ !

(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

वडोदरा (गुजरात) – येथे स्नानगृहामध्ये स्नान करणार्‍या महिलेचा खिडकीतून व्हिडिओ बनवल्याच्या प्रकरणी एका २० वर्षीय मौलानाला अटक करण्यात आली आहे. पीडित महिला फतेहगंजमधील कल्याणनगर येथील एका सरकारी गृहनिर्माण संकुलात रहाते. तेथेच हा मौलानादेखील रहातो. ही घटना ४ एप्रिल या दिवशी  घडली. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, ती आंघोळ करत असतांना तिला ‘व्हेंटिलेशन विंडो’च्या बाहेर एक ‘मोबाईल कॅमेरा’ दिसला. पीडित महिलेने आरडाओरडा केला. यानंतर त्यांनी घराबाहेर बसवलेल्या ‘सीसीटीव्ही कॅमेर्‍या’चे फुटेज पाहिले असता मौलाना हारून पठाण त्या ठिकाणाहून निघून जातांना दिसला.

१. पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीच्या आधारे आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

२.  घटनेच्या दिवशी ‘सीसीटीव्ही फुटेज’मध्ये हारून पठाण स्नानगृहामध्ये डोकावतांना दिसत आहे. आरोपी आधीच त्या महिलेवर लक्ष ठेवून होता, असे पोलिसांनी सांगितले.

३. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

४. पोलिसांनी लोकांना आश्वासन दिले आहे की, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल आणि दोषीला शिक्षा केली जाईल.

संपादकीय भूमिका

वासनांध मौलाना ! सरकारने अशांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !