|
मुंबई – राज्यातील वक्फ बोर्डाच्या ६० टक्क्यांहून अधिक भूमींवर अतिक्रमण झाले आहे. वक्फ कायदा झाल्यामुळे आता राज्यातील भूमींवरील ही अतिक्रमणे सरकार हटवणार आहे. यासाठी ‘जी.आय.एस्. मॅपिंग’ (‘जीआयएस मॅपिंग’ म्हणजे माहिती आणि स्थानाची माहिती एकत्रित करणारे नकाशे सिद्ध करण्याचा एक मार्ग) केले जाणार आहे. या अतिक्रमित जागा कह्यात घेऊन त्यावर निवासी, तसेच व्यावसायिक आस्थापने उभारली जातील. यातून येणारा निधी मुसलमानांच्या विकासासाठी वापरला जाणार असल्याचे समजते. (‘याद्वारे केवळ मुसलमान समाजालाच लाभ देण्याचा एकतर्फी प्रयत्न का ? अन्य धर्मियांच्या विकासासाठी हा निधी का नाही ?’, असे आता कुणी का म्हणत नाही ? – संपादक)
जीआयएस मॅपिंगसाठी भाग्यनगर येथील निजामकालीन दस्तऐवजांचा आधार घेतला जाणार आहे. आतापर्यंत या मालमत्तांसाठी सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. राज्यात सध्या वक्फच्या २३ सहस्र ५६६ मालमत्ता नोंदणीकृत असून त्याचे क्षेत्र ३७ सहस्र ३३० हेक्टर इतके आहे.