Bengaluru Molestation Case : चोहोबाजूंनी झालेल्या टीकेनंतर कर्नाटकच्या गृहमंत्र्यांकडून क्षमायाचना !

मुलीच्या छेडछाडीप्रकरणी केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याचे प्रकरण

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी बेंगळुरूमधील लैंगिक छळाच्या घटनेवर केलेल्या दायित्वशून्य वक्तव्यानंतर आता क्षमा मागितली आहे. ते म्हणाले, ‘मी नेहमीच महिलांच्या सुरक्षिततेविषयी चिंतित असतो. जर माझ्या शब्दांमुळे कुठलीही महिला दुखावली असेल, तर मी क्षमा मागतो.’

बेंगळुरूमधील एका मुलीची छेडछाड करण्यात आली होती. पोलिसांनी या घटनेच्या केलेल्या अन्वेषणाविषयी त्यांना विचारले असता, ते म्हणाले होते की, बेंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये अशा घटना घडत रहातात. (अशा दायित्वशून्य राज्यकर्त्यांना लोकांनी घरी बसवले पाहिजे ! – संपादक) यावरून भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांनी त्यांचे मौन सोडावे अन् जी. परमेश्वर यांच्याकडून त्यागपत्र मागावे.

संपादकीय भूमिका

केवळ क्षमायाचना करून काय उपयोग ? गृहमंत्र्यांची दृष्टी काय आहे ?, हे जनतेसमोर आलेच ! आता अशांना निवडून द्यायचे का ?, हे जनतेने ठरवावे !