मुसलमान महिला अटकेत

भाईंदर (ठाणे) – येथील मोतीलाल नगरमध्ये एका महिलेच्या घरातून ११ किलो ८३० ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारात १७ कोटी ७४ लाख ५० सहस्र रुपयाचे हे अमली पदार्थ जप्त करत एका महिलेला अटक करण्यात आली आहे. सबिना नजीर शेख (वय ४२ वर्षे) असे तिचे नाव आहे. तिने हा अमली पदार्थ ऍन्डी नावाच्या आफ्रिकन नागरिकाकडून आणला असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका :समाजाला व्यसनाधीन करणार्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! |