विश्वाची विलक्षण भाषा ‘संस्कृत’ !

संस्कृत भाषेची समृद्धता

‘इंग्रजीमध्ये ‘The quick brown fox jumps over a lazy dog’, असे एक प्रसिद्ध वाक्य आहे, ज्यामध्ये इंग्रजी वर्णमालेतील सर्व अक्षरे समाविष्ट झाली आहेत. मजेदार गोष्ट ही आहे की, इंग्रजी वर्णमालेमध्ये एकूण २६ अक्षरेच उपलब्ध आहेत ; मात्र या वाक्यामध्ये ३३ अक्षरांचा प्रयोग करण्यात आला आहे. ज्यामध्ये ४ वेळा O (ओ) आणि A (ए), E (इ), U (यू) अन् R (आर्) या अक्षरांचा प्रयोग क्रमशः २ वेळा करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त या वाक्यात अक्षरांचा क्रमही योग्य नाही. जेथे वाक्य आरंभ होते, तेथेच G (जी) अक्षरावरच समाप्त होत आहे.

आता जरा संस्कृतचा हा श्लोक वाचा –

कःखगीघाङ्चिच्छौजाझाञ्ज्ञोटौठीडढणः ।
तथोदधीन पफर्बाभीर्मयोऽरिल्वाशिषां सह ।।

अर्थ : ‘पक्ष्यांविषयी प्रेम, शुद्ध बुद्धीचा, दुसर्‍याच्या बलाचे अपहरण करण्यात पारंगत, शत्रू संहारात अग्र, मनाने निश्चल, निर्भीड अन् महासागराचे सर्जन करणारा कोण आहे ?’, अशा मय राजाला त्याच्या शत्रूंचेही आशीर्वाद प्राप्त आहेत.

वरील श्लोक लक्षपूर्वक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की, संस्कृत वर्णमालेतील सर्व ३३ व्यंजन या श्लोकामध्ये दिसून येतात आणि ते सुद्धा क्रमानुसार ही सुंदरता केवळ अन् केवळ संस्कृतसारख्या समृद्ध भाषेत दृष्टीस पडते. संपूर्ण विश्वात केवळ संस्कृतच एकमेव अशी भाषा आहे, ज्यामध्ये केवळ एका अक्षरानेच पूर्ण वाक्य लिहिले जाते.

(साभार : मासिक ‘गीता स्वाध्याय’, डिसेंबर २०२१)