संस्कृत भाषेत बनवलेला अद्भुत श्लोक

‘किरातार्जुनीयम्’ काव्य संग्रहात केवळ ‘न’ व्यंजनापासून ‘भारवि’ नामक महाकवीने अद्भुत श्लोक बनवला आहे.

न नोननुन्नो नुन्नोनो नाना नानानना ननु ।
नुन्नोऽनुन्नो ननुन्नेनो नानेना नुन्ननुन्ननुत् ।।

– किरातार्जुनीयम्, सर्ग १५, श्लोक १४

अर्थ : हे अनेक मुखे असलेल्या गणांनो, जो मनुष्य युद्धात आपल्यापेक्षा दुर्बलाकडून पराजित होतो, तो खरा मनुष्य नाही; जो आपल्यापेक्षा दुर्बलांना पराजित करतो, तोही खरा मनुष्य नाही. युद्धात ज्या मनुष्याचा स्वामी पराजित नाही, तो पराजित होऊनही पराजित म्हटला जात नाही आणि घायाळ मनुष्याला घायाळ करणारा खरा मनुष्य नाही. (निर्दाेष नाही.)