नवी देहली – चित्रकूटमधील तुलसी पीठाचे संस्थापक आणि संस्कृत विद्वान जगद्गुरु रामभद्राचार्य अन् प्रसिद्ध गीतकार गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. या दोघांनाही ५८ व्या ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याचे ज्ञानपीठ निवड समितीने सांगितले आहे. गुलजार यांना उर्दू साहित्यासाठी, तर जगद्गुरु रामभद्राचार्य यांना संस्कृत साहित्यासाठी वर्ष २०२३ साठी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
गुलजार यांना यापूर्वी वर्ष २००२ मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, वर्ष २०१३ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, वर्ष २००४ मध्ये पद्मभूषण आणि ५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. जगद्गुरु रामभद्राचार्य यांनी १०० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. ते जन्मतः अंध आहेत.