माणसात धर्म हेच विशेष असणे
आहारनिद्राभयमैथुनानि समानि चैतानि नृणां पशूनाम् ।
ज्ञानं नराणामधिको विशेषो ज्ञानेन हीनाः पशुभिः समानाः ॥
– चाणक्यनीती, अध्याय १७, श्लोक १७
अर्थ : आहार, निद्रा, भय, मैथुन या गोष्टी पशू अन् मानव यांत समान आहेत. केवळ ज्ञान हे मानवाकडे असलेली विशेष गोष्ट आहे. ज्ञानविहीन माणसे ही पशूंसारखीच आहेत. – चाणक्यनीती
कोणत्याही परिस्थितीत धर्म सोडू नये !
न जातु कामात् न भयात् न लोभात्
धर्मं त्वजेत् जीवितस्यापि हेतोः ।
नित्यो धर्मः सुखदुःखे तु अनित्ये
जीवो नित्यं हेतुः अस्य तु अनित्यः ॥
अर्थ : विषयभोगासाठी, भयामुळे, लोभामुळे आणि जीव वाचवण्यासाठीसुद्धा धर्म सोडू नये; कारण धर्म नित्य आहे. सुखदुःखे अनित्य आहेत. आत्मा नित्य आहे. त्याचा हेतू, म्हणजे कारण माया अनित्य आहे. हे धर्माचे सार आहे.