साधकांना साधनेचे योग्य दृष्टीकोन देऊन त्यांना अंतर्मुख करणार्या सनातनच्या ७४ व्या संत पू. (सौ.) संगीता विष्णुपंत जाधव (वय ५७ वर्षे) !
‘सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या अस्तित्वामुळे आणि पू. संगीता जाधव यांच्यातील भावामुळे ठाणे सेवाकेंद्रात महर्लोकाप्रमाणे वातावरण झाले आहे’, अशी मला अनुभूती येते.
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
‘‘मला मोक्ष म्हणजे काय ?’, हे ठाऊक नाही. मला केवळ गुरूंचे चरण हवे आहेत. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत गुरूंच्या चरणांची सेवा करत राहीन.’’
साधकांनो, शारीरिक स्थिती मनापासून स्वीकारा आणि शरणागती वाढवून आनंद मिळवा !
‘आपल्याला लाभलेला मनुष्यदेह ही ईश्वराची एक अमूल्य देणगी आहे. जेव्हा काळानुसार वाढते वय, व्याधी किंवा अन्य कारणे यांमुळे देहस्थितीमध्ये पालट होतात, तेव्हा देहाला काही मर्यादा येतात…
कर्करोगाच्या व्याधीला सामोरे जातांना साधिका सौ. लता ढवळीकर यांनी अनुभवलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेचा वर्षाव !
‘‘लता, अजिबात काळजी करू नकोस. तुझ्यावर गुरुदेवांची अनंत कृपा आहे आणि त्यांचे अनंत आशीर्वाद आहेत. गुरुदेव यातूनही तुला सहजपणे बाहेर काढतील. निश्चिंतपणे जा.’
साधकांची प्रेमाने काळजी घेऊन त्यांना घडवणार्या सनातनच्या ६० व्या (समष्टी) संत पू. रेखा काणकोणकर !
‘वयस्कर साधक अनुभवाने मोठे असतात. ते प्रक्रियेला आले असले, तरी त्यांच्या वयाचा मान ठेवायला हवा’, याची मला जाणीव असल्याने मी त्यांच्या समोर आसंदीमध्ये बसले नाही.’ – पू. रेखा काणकोणकर
सद्गुरु सत्यवान कदम यांची सुश्री मधुरा भोसले यांनी सूक्ष्म ज्ञानातून सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भात पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली सूत्रे !
‘१८.३.२०२६ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘सनातन संस्थेला लाभलेले एक दुर्लभ दैवी संतरत्न – सद्गुरु सत्यवान कदम !’ या मथळ्याखाली सुश्री मधुरा भोसले यांचा सूक्ष्म ज्ञानावर आधारित लेख प्रकाशित झाला होता…
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !
सद्गुरु स्वातीताई साधकांच्या साधनेतील किंवा वैयक्तिक अडचणींवर तत्परतेने उपाययोजना सांगतात. ‘एखादा साधक भावनेत अडकला आहे’, असे त्यांच्या लक्षात आल्यास त्या संबंधित साधकाला त्याची जाणीव करून देतात…
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘मी पू. आजींच्या चरणांवर डोके ठेवल्यावर ‘माझ्या आज्ञाचक्रातून पांढरा प्रकाश आत जात आहे’, असे मला जाणवले. तो प्रकाश इतका होता की, मला पू. आजींचे पार्थिव दिसतच नव्हते.
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
पू. अण्णा ‘साधक कुठे न्यून पडले ?’, याची त्यांना जाणीव करून देतात. काही वेळा ते साधकांचे स्वभावदोष आणि अहं यांची कठोरपणे जाणीव करून देऊन ‘त्या साधकांनी कुठे अन् कशा प्रकारे सुधारणा केल्या पाहिजेत ?’, हेही स्पष्टपणे सांगतात.