सद्गुरु सत्यवानदादा (सद्गुरु सत्यवान कदम) , आपण आहात आम्हा साधकांचे आध्यात्मिक पिता ।

सद़्‍गुरु सत्‍यवान कदम

आज तुमच्या वाढदिनी ।
भावपूर्ण वंदन सद्गुरु सत्यवानदादा आपल्या चरणी ।। १ ।।

साधकांचा आध्यात्मिक आधार आपण ।
गुरुदेवांचेच एक रूप आहात आपण ।। २ ।।

आपल्या सहवासात अनुभवता येते अस्तित्व गुरुमाऊलींचे (टीप) ।
आपल्या प्रेमळ वाणीने भरून येते मन सर्व साधकांचे ।। ३ ।।

कु. वैभवी भोवर

आपण आहात आम्हा साधकांचे आध्यात्मिक पिता ।
वात्सल्य जणू आपले गुरुमाऊली समान ।। ४ ।।

आपली नम्रवाणी आणि मधुर हास्य पाहून भाव आमचा दाटे ।
ध्येय आम्हाला लाभो आपल्यासम ‘गुरूंचा आदर्श शिष्य’ होण्याचे।। ५ ।।

सद्गुरु दादा, आपण समवेत आहात, हाच आधार प्रत्येक साधकाच्या मनी ।
आपल्या सत्संगासाठी आमचे मन नेहमी व्याकुळ होई ।। ६ ।।

साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी तळमळ आपली अखंड ।
आबाल-वृद्ध सर्व साधकांना जोडून ठेवता आपण सदैव ।। ७ ।।

आपल्या गुणांचे वर्णन करण्यास हा जीव अज्ञानी आहे ।
आज कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तो व्याकुळही झाला आहे ।। ८ ।।

आम्ही सर्व साधक आज आपल्या चरणी नतमस्तक होतो ।
आपण जी शिकवण दिली, ती आचरणात आणण्या आपल्या चरणी शरण येतो ।। ९ ।।

गुरुमाऊली, एकच प्रार्थना तुमच्या चरणी ।
आम्हाला सद्गुरूंकडून शिकलेले कृतीत आणता येऊ दे ।। १० ।।

टीप : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

– कु. वैभवी सुनील भोवर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय २८ वर्षे), कुडाळ सेवाकेंद्र (१८.३.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक