सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम (वय ६२ वर्षे) यांची सूक्ष्म ज्ञानातून उमगलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

चैत्र शुक्ल प्रतिपदा (गुढीपाडवा, ३०.३.२०२५) या दिवशी सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना सूक्ष्म ज्ञानातून उमगलेली काही आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये ३१ मार्च या दिवशी पाहिली. आज उर्वरित गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/897862.html

सद़्‍गुरु सत्‍यवान कदम

५. सद्गुरु दादांमध्ये कार्यरत झालेल्या दैवी तेजाचे प्रमाण आणि त्यामुळे सूक्ष्म स्तरावर होणारे कार्य 

६. सद्गुरु दादांच्या आध्यात्मिक पातळीनुसार त्यांची जाणवलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये 

७. सद्गुरु दादांमध्ये त्यांच्या आध्यात्मिक पातळीनुसार कार्यरत झालेल्या दैवी घटकांचे होणारे प्रक्षेपण 

सद्गुरु सत्यवानदादांच्या आध्यात्मिक पातळीसह त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या लहरींचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाने साधकाचे अस्तित्व, स्थान आणि सभोवतालचे संपूर्ण वायूमंडल यांची अखंड शुद्धी होत असून त्यांची सात्त्विकता वाढत आहे. त्यामुळे ते रहात असलेल्या ठिकाणाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

८. श्री गुरुकृपेने सद्गुरु दादांच्या व्यष्टी प्रकृतीचे रूपांतर समष्टी प्रकृतीत होणे  

सद्गुरु दादांची मूळ प्रकृती व्यष्टी स्वरूपाची होती. जेव्हा ते मुंबई येथील सेवाकेंद्रात साधना करत होते, तेव्हापासून गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) त्यांना घडवू लागली. त्यामुळे त्यांनी आश्रमस्तरावरील विविध सेवांमध्ये सहभागी होऊन हळूहळू आश्रमातील आणि त्यानंतर प्रसारातील सेवांचे उत्तरदायित्व घेण्यास प्रारंभ केला. त्यांनी भक्तीभावाने केलेली सेवा आणि साधना पाहून श्री गुरुमाऊली त्यांच्यावर प्रसन्न झाली. श्री गुरुमाऊली सद्गुरु दादांवर कृपावंत झाल्यामुळे त्यांच्यातील भगवंताप्रतीच्या आध्यात्मिक भावाचे रूपांतर भक्तीत आणि साधकांविषयीच्या प्रेमभावाचे रूपांतर प्रीतीत झाले, तसेच त्यांची वृत्ती अंतर्मुख रहाण्यासह व्यापक झाली. ‘सद्गुरु दादांची प्रकृती व्यष्टीकडून समष्टीकडे कशी वळली ?’, हे त्यांना कळलेसुद्धा नाही. आता ते समष्टी सद्गुरुपदावर विराजमान झाले आहेत.

९. भविष्यातील दायित्व  

हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावर सद्गुरु दादा समष्टी स्तरावरील मोठे उत्तरदायित्व सांभाळणार आहेत. ते ‘साधकांचे मार्गदर्शक गुरु, उपायगुरु आणि मोक्षगुरु’, अशा तिन्ही गुरूंचे उत्तरदायित्व समर्थपणे सांभाळून अनेक जिवांचा उद्धार करणार आहेत.

१०. सारांश 

सद्गुरु सत्यवानदादांच्या आध्यात्मिक गुणवैशिष्ट्यांविषयी सूक्ष्मातून वरील ज्ञान मिळाल्यावर मला म्हणावेसे वाटते, ‘झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु यासम हा !’, म्हणजे ‘काही लोक असे असतात की, त्यांच्याशी तुलना करण्याजोगे पुरुष भूतकाळात किंवा वर्तमानकाळात आढळत नाहीत; एवढेच नव्हे, तर पुढेही होण्याची आशा नसते. असे अद्वितीय लोक म्हणजे त्यांच्यासारखे तेच !’

कृतज्ञता : ‘श्री गुरुकृपेमुळे मला सद्गुरु सत्यवानदादांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये उमजली आणि साधनेची प्रेरणा मिळाली’, याबद्दल मी श्री गुरुचरणी अन् सद्गुरु सत्यवानदादा यांच्या चरणी लक्ष लक्ष कृतज्ञतापुष्पे समर्पित करते.’ (समाप्त)

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.३.२०२५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक