देवद, पनवेल येथील आश्रमातील सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर यांनी मायेतील जीवन कसे असते ? आणि साधनेमुळे जीवनात काय पालट होतो ? याविषयी केलेले काव्य येथे दिले आहे.

मायेतील आवडती वस्तू मिळवावी लागते ।
सर्व काही क्षणभंगूर अन् स्थुलातील असते ।। १ ।।
अध्यात्मात आवश्यक ते भगवंत देतसे ।
सर्वत्र समाधान अन् आनंददायी वाटतसे ।। २ ।।
साधनेने अंतःचक्षूने जग सुंदर दिसते ।
पोकळीत चैतन्य ठासून भरलेले असते ।। ३ ।।
मायेतील जग जसे दिसते, तसे नसते ।
म्हणून जग जन्म-मृत्यूच्या फेर्यांत फसते ।। ४ ।।
साधनेने जीवन सत्-चित्-आनंदी होते ।
गुरुकृपेने (टीप १) उच्च लोकी स्थान मिळते ।। ५ ।।
टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |