चैत्र शुक्ल प्रतिपदा (गुढीपाडवा, ३०.३.२०२५) या दिवशी सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना सूक्ष्म ज्ञानातून उमगलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. सद्गुरु सत्यवान कदम हे शिवाच्या ‘पिनाक’ या धनुष्याचे अवतार असणे
‘सद्गुरु सत्यवान कदम हे शिवाच्या प्रख्यात ‘पिनाक’ या धनुष्याचे अवतार आहेत. त्रेतायुगात त्यांचा जन्म ‘पिनाकऋषि’, या नावाने झाला. त्यानंतर त्रेता, द्वापर आणि कलि या ३ युगांमध्ये त्यांचे एकूण २० जन्म झाले आहेत. हा त्यांचा २१ वा जन्म आहे. ते प्रत्येक वेळी श्रीविष्णूच्या अवताराला साहाय्य करण्याच्या दृष्टीने पृथ्वीवर धर्मराज्य स्थापन करण्यासाठी कार्यरत असतात. या जन्मातही ते हेच कार्य करत आहेत. हा त्यांचा शेवटचा मनुष्यजन्म असून या जन्मात त्यांनी देहत्याग केल्यावर ते सत्यलोकात जाणार आहेत आणि तेथूनच पृथ्वीवरील हिंदुत्वनिष्ठ अन् साधक यांना धर्मराज्य करण्यासाठी साहाय्य करणार आहेत.
२. सद्गुरु सत्यवान कदम यांच्यामध्ये कार्यरत असणारी देवतांची तत्त्वे

मागील २० जन्मांमध्ये सद्गुरु सत्यवानदादांनी शिवाची पुष्कळ उपासना केली आहे. त्याचप्रमाणे श्रीरामावताराच्या वेळी त्यांनी ध्यानयोगाद्वारे हनुमानाची उपासना करून श्रीरामाच्या कार्यातील सूक्ष्मातील अडथळे दूर केले होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये ७ टक्के शिवतत्त्व आणि ३ टक्के हनुमानतत्त्व आहे.
३. सद्गुरु सत्यवानदादांमध्ये असणारे विविध ईश्वरी गुण
३ अ. वैराग्य : सद्गुरु दादांमध्ये शिवतत्त्व प्रबळ असल्यामुळे त्यांच्यात जन्मतःच ५० टक्के वैराग्य होते आणि सद्गुरुपदी विराजमान झाल्यावर त्यांच्यात ८० टक्के वैराग्य आले आहे. त्यामुळे ते त्यांच्या जीवनातील व्यष्टी आणि समष्टी स्तरांवरील मायेतील अनेक घटनांकडे साक्षीभावाने पाहू शकतात.
३ आ. ब्रह्मचर्य : सद्गुरु दादांमध्ये असणार्या हनुमानतत्त्वामुळे ते ब्रह्मचर्याचे अखंड पालन करतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये पुष्कळ ओज (तेजतत्त्वाच्या स्तरावरील सात्त्विकता) आणि दैवी तेज कार्यरत झाले आहे.
३ इ. भाव आणि भक्ती : जेव्हा सद्गुरु दादांमध्ये शिवतत्त्व कार्यरत होते, तेव्हा ते विष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी आत्मनिवेदन भक्तीद्वारे जोडले जातात. जेव्हा सद्गुरु दादांमध्ये हनुमानतत्त्व प्रबळ होते, तेव्हा ते प्रभु श्रीरामस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांशी दास्यभक्तीद्वारे जोडले जातात.
३ ई. आदर्श शिष्य : जेव्हा सद्गुरु दादांना सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर हे गुरुरूपात भेटले, तेव्हा त्यांनी त्यांचे सर्वस्व श्री गुरुचरणी समर्पित करून सर्वस्वाचा त्याग केला. सद्गुरु दादा हे ‘आदर्श शिष्य कसा असावा ?’, याचे एक उदाहरण आहे.
४. सद्गुरु दादांनी विविध योगमार्गांनी केलेल्या साधनेचे प्रमाण आणि त्यामुळे त्यांना आध्यात्मिक स्तरावर झालेला लाभ, त्यांच्यात विकसित झालेले दैवी गुण अन् त्यांना प्राप्त झालेले बळ
टीप १ – आध्यात्मिक पातळीनुसार सद्गुरु सत्यवानदादांना ध्यानयोगानुसार प्राप्त झालेल्या विविध समाधी अवस्था आणि त्यांचा आध्यात्मिक अर्थ
टीप २ – सवितर्क समाधी : या अवस्थेतील ध्यानात योग्याचे मन भगवंताची चेतना अनुभवण्यासाठी सतर्क झालेले असते. त्यामुळे या ध्यानावस्थेला ‘सवितर्क समाधी’, असे संबोधले जाते.
टीप ३ – सविचार समाधी : सवितर्क समाधी अनुभवत असतांना चित्त कार्यरत असल्यामुळे मनात कुठला ना कुठला सुप्त विचार चालू असल्यामुळे या समाधी अवस्थेला ‘सविचार समाधी’, असे संबोधले जाते.
टीप ४ -‘महत्तत्त्वालय ’ – ‘द्वैतरूपी’ महान तत्त्वाचा लय झाल्यामुळे या समाधी अवस्थेला ‘महत्तत्त्वालय ’ असे संबोधले आहे.
(‘वर्ष २०२४ मध्ये सद्गुरु सत्यवान कदम यांची आध्यात्मिक पातळी ८५ टक्के होती.’ – संकलक) (क्रमश:)
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.३.२०२५)
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/898094.html
|