दोघा हिंदु राजांनी अकबर आणि औरंगजेब यांना मरण्यास भाग पाडले !

नोएडा (उत्तरप्रदेश) – महाराणा प्रताप हे खरे नायक आहेत, ज्यांनी अकबराला गुडघे टेकण्यास भाग पाडले. खरे नायक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांनी औरंगजेबाला वेदनादायक मृत्युदंड देण्यास भाग पाडले. छत्रपती शिवाजी महाराजच नायक असू शकतात, औरंगजेब कदापि नाही, असे रोखठोक वक्तव्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले. महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी ते येथे आले होते. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे नाव न घेता योगी आदित्यनाथ म्हणाले की, जे राष्ट्रीय नायकांचा आदर करू शकत नाहीत, ते कोणत्या ना कोणत्या मानसिक विकाराने ग्रस्त आहेत. त्यांना उपचारांची आवश्यकता आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की,
१. ज्या लोकांनी सनातन धर्म, भारत आणि त्याची संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी आपल्या परंपरा पायदळी तुडवण्याचा कट रचला, ते कधीही भारताचे राष्ट्रीय नेते असू शकत नाहीत.
२. ज्यांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी काहीतरी समर्पित केले आहे, त्यांना आम्ही राष्ट्रीय नेते मानतो. यामुळेच महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंद सिंह यांचे योगदान अविस्मरणीय आहे.
३. ज्यांना भारतीय इतिहास आणि परंपरा ठाऊक नाहीत, त्यांना भारताची संस्कृतीही कळणार नाही. त्या लोकांकडून काहीही अपेक्षा करता येत नाही. आजही ते विहिरीतील बेडकासारखे जीवन जगत आहेत.
४. सर्वांनी महाकुंभपर्व आठवा. जेव्हा धर्मद्रोही लोक महाकुंभपर्वाविषयी नकारात्मक प्रचार करायचे, तेव्हा तितक्याच संख्येने लोक महाकुंभपर्वात यायचे आणि त्याला हिणवायचे. जर कुणी म्हटले की, येथे घाण आहे, तर सामान्य माणूस आणि सनातन धर्माचे अनुयायी त्यांना उत्तर देतील की, ‘वाहते पाणी आणि फिरणारे योगी कधीही घाण नसतात. कधीही अपवित्र होत नाहीत.’
५. मला वाटते की, मी त्रिवेणीचा महासंगमाकडे पवित्र भावनेने पहातो आणि त्याच पवित्र भावनेने ६६ कोटी ३० लाख भाविक प्रयागराजला पोचले अन् श्रद्धेची अनुभूती घेतली.
संपादकीय भूमिकाकिती हिंदु नेते हे सत्य असे उघडपणे सांगण्याचे धाडस दाखवतात ? |