|

मुंबई – मी काहीही चुकीचे बोललो नाही; मात्र तरीही सभागृहाचे कामकाज चालावे, गोंधळ होऊ नये, तसेच अधिवेशनात कामे मार्गी लागावीत, यासाठी विधानसभेच्या बाहेर केलेले विधान मी मागे घेतले. तरीही माझ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. हा केवळ माझा नाही, तर मी ज्या लोकांचे प्रतिनिधित्व करतो, त्यांच्यावरही अन्याय आहे, असे विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले. याविषयीचा व्हिडिओ त्यांनी ‘एक्स’द्वारे प्रसारित केला आहे.
अबू आझमी यांचा उद्दामपणा !
(म्हणे) ‘मला काही झाले, तर सरकार उत्तरदायी असेल !’’माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना ते म्हणाले, ‘‘मी महापुरुषांचा अवमान केला नाही. मला जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मला काही झाले, तर सरकार उत्तरदायी असेल.’’ |
संपादकीय भूमिकाचुकीचे बोलले नाही, तर इतक्या मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलने करणारी जनता किंवा निलंबनाच्या कारवाईची मागणी करणारे लोकप्रतिनिधी दूधखुळे आहेत का ? |