CM Yogi Adityanath UP : अबू आझमी याला उत्तरप्रदेशात पाठवा, आम्ही त्याच्यावर उपचार करतो !

उत्तरप्रदेशाच्या विधान परिषदेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची समाजवादी पक्षाकडे मागणी !

यांना पक्षातून काढून उत्तरप्रदेशाला पाठवा, आम्ही त्यांच्यावर उपचार करू – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) : अबू आझमी यांना (समाजवादी) पक्षातून काढून उत्तरप्रदेशाला पाठवा. आम्ही त्यांच्यावर उपचार करू. उत्तरप्रदेश अशा लोकांशी कसे वागते, हे सर्वांना ठाऊक आहे, अशा शब्दांत उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षावर टीका केली. अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे विधान दिल्यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षावर टीका करतांना वरील विधान केले.

हे लोक महाकुंभाला शाप देतात आणि औरंगजेबाचा अभिमान बाळगतात !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, समाजवादी पक्षाने एकीकडे महाकुंभमेळ्याला दोष दिला आणि आता देशातील मंदिरे उद्ध्वस्त करणार्‍या औरंगजेबासारख्या व्यक्तीची प्रशंसा समाजवादी पक्षाच्या एका आमदाराकडून होते, तरीही समाजवादी पक्षाकडून त्या विधानाचा निषेध का केला जात नाही ? समाजवादी पक्षाचे त्यांच्या आमदारांवर नियंत्रण नाही. समाजवादी पक्षाने त्या नेत्याच्या (अबू आझमी यांच्या) औरंगजेबाचे उदात्तीकरण करणार्‍या विधानाचे खंडण करावे आणि त्यांना पक्षातून काढून टाकावे. हे लोक महाकुंभाला शाप देतात आणि औरंगजेबाचा अभिमान बाळगतात.

शाहजहान याने म्हटले होते, हिंदूंची मुले मृत्यूनंतरही आई-वडिलांची सेवा करतात !

आग्र्याच्या किल्ल्यातील या महालात औरंगजेबाने आपल्या वडिलांना आठ वर्षे कैदेत ठेवले होते !

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, औरंगजेब हा समाजवादी पक्षाच्या लोकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे ज्याने स्वतःच्या वडिलांना तुरुंगात टाकले होते आणि त्यांना पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी आसुसण्यास लावले होते. यामुळे मुसलमानांमध्ये कुणी औरंगजेब असे नाव ठेवत नाही; कारण नाव ठेवल्यावर तो काय दिवे लावणार, हे ठाऊक असते. औरंगजेब भारताचे इस्लामीकरण करण्यासाठी प्रयत्न करत होता. औरंगजेबाचे वडील असणारे बादशाह शाहजहान याने त्याच्या जीवनचरित्रात लिहून ठेवले आहे की, औरंगजेबासारखा मुलगा कुणाच्याही घरात जन्माला येऊ नये. आमच्यापेक्षा हिंदूंची मुले चांगली असतात. ते जीवनभरच आई-वडिलांची सेवा करतात, असे नाही, तर मृत्यूनंतरही प्रतिवर्षी त्यांच्यासाठी श्राद्ध करतात.

संपादकीय भूमिका

असे केवळ योगी आदित्यनाथ हेच बोलू शकतात, इतरांमध्ये तसे बळ नाही; कारण योगी आदित्यनाथ संत आहेत. त्यांच्याकडे साधनेचे बळ आहे, ईश्‍वराचा, गुरूंचा आशीर्वाद आहे. प्रत्येक शासनकर्ता असा असेल, तर हिंदु राष्ट्र येण्यास वेळ लागणार नाही !