परमपवित्र महर्षि व्यासांनी लिहिलेला इतिहास म्हणजे ‘महाभारत’ प्रमाण असणे !

रागद्वेष रहित अशा व्यासांसारख्या महनीय, परमपवित्र महापुरुषाने लिहिलेला इतिहास म्हणजे ‘महाभारत’ आम्हाला प्रमाण आहे. – गुरुदेव (डॉ.) काटेस्वामीजी

संतकवी दासगणु महाराज शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष असतांनाचे पावित्र्य मंदिर सरकारीकरणानंतर लयाला जाणे

दासगणु महाराजांसारखा संत पुरुष अध्यक्ष असल्याने देवस्थानचे पावित्र्य उच्च दर्जाचे होते आणि कारभार अत्यंत स्वच्छ होता. सरकार नियुक्त विश्‍वस्त आले, पुढारी त्यात घुसले आणि त्या संस्थानचे पावित्र्य लयाला गेले अन् सर्व स्थिती बिघडली.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, या उद्देशाने परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासूंना केलेल्या मार्गदर्शनाचा समाप्तीचा भाग . . .

कोटी कोटी प्रणाम !

• गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांची आज पुण्यतिथी
• केरी, फोंडा येथील श्री विजयादुर्गादेवीचा जत्रोत्सव !
• मूठवाडी, उभादांडा (वेंगुर्ला) येथील श्री केपादेवीचा जत्रोत्सव !
• कामळेवीर (सिंधुदुर्ग) येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराचा जत्रोत्सव

कोटी कोटी प्रणाम !

• स्वामी श्रद्धानंद यांचा आज स्मृतीदिन (दिनांकानुसार)
• सांगली येथील सनातनचे ८९ वे संत पू. सदाशिव परांजपेआजोबा यांचा आज वाढदिवस
• ओशेल, शिवोली (गोवा) येथील श्री देवी महाकालिका कुंभळेश्‍वर देवतांचा जत्रोत्सव !

वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांचा देहत्याग

हिंदु धर्माची बाजू परखडपणे मांडणारे, तसेच हिंदु धर्मावरील आघातांचे वेळोवेळी खंडण करणारे, सनातन संस्थेवर पित्याप्रमाणे प्रेम करणारे वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांनी त्यांच्या टाकळी या गावी देहत्याग केला.

सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांचे संतपद घोषित !

ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांच्या सनातनच्या देवद येथील आश्रमातील सन २०१६ च्या भेटी वेळीच त्यांचे संतपद घोषित करण्यात आले. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी त्यांचा शाल, श्रीफळ, प्रसाद आणि श्रीकृष्णाचे चित्र देऊन सन्मान केला होता.