सकारात्मक अन् शिकण्याची वृत्ती असलेली आणि कुठेही गेली, तरी साधकत्वाला धरून वागणारी रामनाथी येथील कु. सानिका सुनील सोनीकर (वय १५ वर्षे) !

फाल्गुन कृष्ण पक्ष सप्तमी या दिवशी कु. सानिका सुनील सोनीकर हिचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

प्रत्येक कृती परिपूर्ण करणार्‍या, कर्तव्यदक्ष आणि गुरुदेवांप्रती अव्यक्त भाव असलेल्या देवद आश्रमातील सौ. मीरा मंगलकुमार कुलकर्णी (वय ६० वर्षे) !

आज देवद आश्रमातील सौ. मीरा कुलकर्णी ६१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचे पती आणि मुलगी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये . . .

सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याची लक्षात आलेली वैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे

सद्गुरु राजेंद्रदादा घेत असलेल्या आढाव्यात बसल्याने आणि ते देत असलेल्या गृहपाठामुळे मला अन् माझ्यासारख्या अनेक साधकांना जीवनातील आध्यात्मिक आनंद अनुभवता येऊ लागला आहे.

खडतर प्रारब्धावर मात करून देवावर श्रद्धा ठेवून साधना करणार्‍या देवद आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुलभा मालखरेआजी (वय ८० वर्षे) !

लहानपणापासून अत्यंत खडतर जीवन जगूनही मालखरेआजींनी ६६ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांनी सर्वांपुढे एक आदर्शच ठेवला आहे.

व्यष्टी साधनेच्या आढाव्यातून साधकांच्या मनावर साधना करण्याचे महत्त्व बिंबवणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

‘सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी व्यष्टी साधनेच्या आढावा गटात चिंतन करण्यासाठी आम्हाला काही विषय दिले. नंतर व्यष्टी आढाव्यात मी केलेले चिंतन वाचून दाखवले. ते पुढीलप्रमाणे…

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या संदर्भात सौ. अंजली झरकर यांना आलेली अनुभूती

व्यष्टी साधनेचे प्रयत्न होत नसल्यानेे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात कठोर शब्दांत जाणीव करून देणे, त्यानंतर सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या संदर्भात सौ. अंजली झरकरअंजली झरकर यांना आलेली अनुभूती येथे दिली आहे.

‘इतरांशी जुळवून घेता न येणे’, या स्वभावदोषावर ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. महानंदा गिरिधर पाटील यांनी चिंतन करून केलेले प्रयत्न !

‘इतरांशी जुळवून घेता न येणे’, हा स्वभावदोष दूर होण्यासाठी काय प्रयत्न केले ?’, या संदर्भात साधिकेची झालेली विचारप्रक्रिया देत आहोत . . .

मनातील सहसाधकांविषयीच्या नकारात्मक विचारांवर मात करून त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी कु. महानंदा पाटील यांनी केलेले प्रयत्न !

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात दिलेल्या गृहपाठानुसार साधकांशी जुळवून घेण्यासाठी साधिकेने कसे प्रयत्न केले ?’, ते येथे दिले आहेत.

स्वभावदोष आणि अहं यांच्या तीव्रतेमुळे मनात विचारांचे द्वंद्व निर्माण होणे अन् सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या आढाव्यामुळे त्यावर मात करता येणे

माझा स्वतःचाच स्वभावदोष आड आला; पण मी इतरांना दोष देत होते. ‘माझी चूक झाल्यास माझे मन लगेच इतरांना दोष देते, त्यांची चूक पहाते’, याची मला जाणीव झाली.

व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी करून घेतलेली मनाची सिद्धता आणि त्या वेळी जाणवलेली सूत्रे

‘प्रत्येक साधक व्यष्टी साधनेचा आढावा घेण्यासाठी सिद्ध झाला पाहिजे. त्याला कोणत्याही क्षणी आढावा घ्यायला सांगितल्यावर त्याने आढावा घेतला पाहिजे’, अशी सद्गुरु राजेंद्रदादांची तळमळ असते’, असे मला जाणवले.