मनमोकळेपणा

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेली साधनेविषयीची मौलिक सूत्रे

सद्गुरु राजेंद्र शिंदे

‘आपल्या मनातील विचार मोकळेपणाने इतरांना सांगितल्यास विचारांमुळे आपल्याला आलेला ताण अल्प होतो. बर्‍याच वेळा मनात येणारे विचार योग्य कि अयोग्य, हे न कळल्याने अस्वस्थता येते. अशा वेळी ते विचार उत्तरदायी साधकांना सांगून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. असे केल्याने अनावश्यक विचारात वाया जाणारा वेळ आणि ऊर्जा वाचते. विचारांवर वेळीच मार्ग न काढल्यास मनोदेहावरील रज-तमाचे आवरण वाढून अनिष्ट शक्तींचा त्रास वाढतो.’

– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)