कर्तेपणा
सेवा करण्यापूर्वी आणि झाल्यानंतर ‘ती देवानेच करवून घेतली आहे’, यासाठी कृतज्ञता व्यक्त केल्यास कर्तेपणा नष्ट होऊन त्या सेवेतून आपली साधना होईल.’
सेवा करण्यापूर्वी आणि झाल्यानंतर ‘ती देवानेच करवून घेतली आहे’, यासाठी कृतज्ञता व्यक्त केल्यास कर्तेपणा नष्ट होऊन त्या सेवेतून आपली साधना होईल.’
‘अपेक्षा करणे’ हे अहंचे लक्षण आहे. अपेक्षापूर्ती झाल्यावर तात्कालिक सुख मिळते; परंतु त्यामुळे अहंचे पोषण होते आणि अपेक्षेप्रमाणे झाले नाही की, दुःख होते.
जन्मल्यापासून आतापर्यंत प्रत्येक प्रसंगात देवाने मला कसे साहाय्य केले ?’ तसेच ‘तो मला साधनेत सतत साहाय्य करत आहे’, हे आठवून सतत कृतज्ञता व्यक्त करावी.
मनमोकळेपणाने मनातील विचार त्वरित उत्तरदायी साधक किंवा संबंधितांना सांगावेत. मनातील विचारांचा निचरा होऊन मन शांत होण्यासाठी ‘आध्यात्मिक मित्र किंवा मैत्रीण’ असल्यास त्यांच्याशी बोलावे.
आत्मनिवेदनाच्या माध्यमातून मनातील सर्व विचार भगवंताला सांगण्याची सवय लावावी. आत्मनिवेदनामुळे मन हलके होण्याच्या समवेत ईश्वराशी अनुसंधानही साधले जाते.
‘मी काहीही खाल्ले, तरी त्याचे रक्त बनते, ही किमया कोण करू शकतो ? माझा प्रत्येक श्वास कुणामुळे अखंड चालू आहे ?यांसारख्या प्रश्नांची उत्तरे शोधल्यास भगवंताची लीला अनुभवता येऊ शकते. यांसाठी दिवसातून मी किती वेळा कृतज्ञता व्यक्त करतो ?’
आपल्या मनातील विचार मोकळेपणाने इतरांना सांगितल्यास विचारांमुळे आपल्याला आलेला ताण अल्प होतो. अशा वेळी ते विचार उत्तरदायी साधकांना सांगून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे.
व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही साधनेकडे लक्ष देणार्या साधकांवर गुरुकृपेचा ओघ अधिक असतो.
या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने ‘ऑनलाईन’ धर्म अन् अध्यात्म प्रसारास आरंभ झाला, समाजातून भरभरून प्रतिसाद ही लाभला.
चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी श्री. मेहुल राऊत यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.