एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या बोटांतून प्रक्षेपित होणार्या आकाशतत्त्वाची, म्हणजेच नादाची अनुभूती घेण्यासाठी काही प्रयोग आम्हा काही साधकांसमोर केले. ‘त्या प्रयोगांच्या वेळी मला काय जाणवले ?’, हे येथे दिले आहे. याविषयी १४ फेब्रुवारी २०२५ या दिवशी आपण पहिला प्रयोग आणि त्या संदर्भातील अनुभूती पाहिल्या. आज दुसरा प्रयोग आणि अनुभूती पाहूया.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/884374.html

४ आ. प्रयोग दुसरा

४ आ १. प्रयोग : या प्रयोगामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आम्हाला ‘प्रत्येक बोटातून प्रक्षेपित होणार्या आकाशतत्त्वाची काय वेगवेगळी अनुभूती येते ?’, हे अभ्यासायला सांगितले. यासाठी आम्ही उजव्या हाताच्या करंगळीपासून प्रयोगाला आरंभ करून अंगठ्यापर्यंत एका एका बोटाचा नाद ऐकला.
४ आ २. अनुभूती : यासंदर्भात मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
४ आ ३. अनुभूतींमागील शास्त्र
अ. येथे प्रत्येक बोटातून अधिक प्रमाणात प्रक्षेपित होणार्या विशिष्ट पंचतत्त्वाप्रमाणे अनुभूती आल्या, उदा. करंगळीतील पृथ्वीतत्त्वामुळे जडत्व जाणवणे, अनामिकेतील आपतत्वामुळे कमी जडत्व जाणवणे , मध्यमेतील तेजतत्त्वामुळे उष्णता जाणवणे, तर्जनीतील वायुतत्त्वामुळे हलकेपणा जाणवणे आणि अंगठ्यातील आकाशतत्त्वामुळे शांत वाटणे.
आ. करंगळीतून आकाशतत्त्व अगदी अल्प प्रमाणात प्रक्षेपित होते. करंगळीच्या पुढील बोटांतून आकाशतत्त्व प्रक्षेपित होण्याचे प्रमाण वाढत जाऊन शेवटच्या अंगठ्यातून ते सर्वाधिक प्रमाणात प्रक्षेपित होते. त्यामुळे करंगळी ते अंगठा या क्रमाने गेल्यावर सूक्ष्मातील नाद ऐकू येण्याचे प्रमाण वाढत गेले. अंगठ्यामुळे सर्वांत जास्त प्रमाणात आकाशतत्त्वाची अनुभूती आली, उदा. शांत वाटणे, देहाचे अस्तित्व न जाणवणे आणि ‘आपण निर्गुण पोकळीत आहोत’, असे जाणवणे.
४ आ ३ अ. अंगठ्यातून आकाशतत्त्व प्रक्षेपित होत असूनही अंगठ्यामुळे कोणताही नाद ऐकू न येता ‘शांत वाटणे, देहाचे अस्तित्व न जाणवणे’, अशा अनुभूती येण्याचे कारण : अंगठ्यातून आकाशतत्त्व प्रक्षेपित होत असल्याने आणि पंचतत्त्वांपैकी आकाशतत्त्व हे सर्वाधिक निर्गुण स्तरावरील असल्याने अंगठा कानाजवळ नेल्यावर कोणताही नाद ऐकू न येता ‘शांत वाटणे, देहाचे अस्तित्व न जाणवणे, पोकळी जाणवणे’, अशा निर्गुण स्तरावरील अनुभूती आल्या. आकाशतत्त्वातूनच, म्हणजे निर्गुणातून सर्व गोष्टींची उत्पत्ती होत असते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेनेच आम्हा साधकांना बोटांतून प्रक्षेपित होणार्या आकाशतत्त्वाच्या अनुभूती घेता आल्या. त्यांनी प्रयोग करून आम्हाला शिकवले. यासाठी आम्ही त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
(समाप्त)
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |