Defense Minister Rajnath Singh : महाकुंभपर्वाकडे कुठला समुदाय किंवा धर्म यांच्याशी जोडून पाहिले जाऊ नये !

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे त्रिवेणी संगमात स्नान

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

प्रयागराज – कुंभमेळा हा भारतीयता, आध्यत्मिकता आणि सांस्कृती यांचे पर्व आहे. त्यामुळे महाकुंभपर्वाकडे कुठला समुदाय किंवा धर्म यांच्याशी जोडून पाहिले जाऊ नये, असे विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी १८ जानेवारी या दिवशी येथील पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केल्यानंतर केले. ते उत्तरप्रदेश राज्याच्या दौर्‍यावर असतांना त्यांनी प्रयागराज येथे येऊन संगमस्नान, तसेच पूजा आणि आरती केली.

ते पुढे म्हणाले की, पवित्र त्रिवेणी संगमान स्नान करणे, हे मी माझे भाग्य समजतो. मला फार कृतज्ञता वाटते. भारतातूनच नव्हे, तर देशातील कानाकोपर्‍यातून लोक येथे स्नानासाठी येतात. कुणाला जर भारत आणि भारतीयता समजून घ्यायची असेल, तर त्याने येथे महाकुंभपर्वात यावे.

संपादकीय भूमिका

  • हिंदु धर्मातील सर्वांत मोठ्या महाकुंभपर्वाकडे ‘सेक्युलर (निधर्मी) दृष्टीने’ही पाहिले जाऊ नये, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
  • प्रतिदिन शेकडो विदेशी भाविक महाकुंभपर्वात येऊन स्नान करून कृतकृतार्थ होत आहेत. असंख्य विदेशींनी येथे येऊन महंत, साध्वी आदी दीक्षाही घेतली आहे अन् हे सर्व ते अभिमानाने सांगत आहेत, हेही लक्षात घ्यायला हवे !