Rajnath Singh Threatened By Pannun : अमेरिकापुरस्कृत खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना धमकी दिल्याचे उघड

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू

नवी देहली – खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’चा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याने गेल्या वर्षी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी दूरभाष करून त्यांना धमकी दिल्याची घटना आता समोर आली आहे. एका इंग्रजी दैनिकाने या संदर्भात वृत्त प्रकाशित केले आहे.

२२ जुलै २०२४ या दिवशी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानाच्या दूरभाषवर पन्नू याने ‘व्हॉईस संदेशा’त चेतावणी दिली होती की, ‘संसद सदस्यांना खलिस्तानच्या संदर्भात सार्वमताचा अनुभव घ्यायचा नसेल, तर घरीच रहा.’ हा दूरभाष आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून आला होता. सरकारने ही माहिती न्यायालयीन लवादाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. या लवादाने याच महिन्यात पुढील ५ वर्षांसाठी या संघटनेला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करण्याचा केंद्रशासनाचा निर्णय कायम ठेवला आहे.

संपादकीय भूमिका

अमेरिकेत ट्रम्प यांचे सरकार आल्यावर तरी पन्नू आणि त्याच्या संघटनेवर कारवाई केली जाणार आहे का ? त्याला भारताच्या कह्यात दिले जाणार आहे का ? भारत यासाठी दबाव निर्माण करत आहे का ?