Russia Invites PM Modi : रशियातील कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी असणार प्रमुख पाहुणे

रशियाचा नाझी जर्मनीवरील विजयाचा ८० वा वर्धापन दिन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन

मॉस्को (रशिया) – रशिया सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ९ मे या दिवशी  मॉस्को येथे होणार्‍या ८० व्या विजय दिनाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी औपचारिकपणे आमंत्रित केले आहे. हा समारंभ दुसर्‍या महायुद्धात नाझी जर्मनीवर सोव्हिएत युनियनच्या विजयाचे प्रतीक आहे. तथापि भारत सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ९ मे दिवशी विजय दिवसाच्या संचलनाच्या कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व करतील. याचा अर्थ पंतप्रधान मोदी प्रत्यक्ष उपस्थित रहाण्याची शक्यता अल्प आहे.

दुसरीकडे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे या वर्षाच्या अखेरीस भारताला भेट देतील, असे रशियाने म्हटले होते. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण  केल्यानंतर हा त्यांचा पहिलाच भारत दौरा असेल. पुतिन यांच्या भेटीचा दिनांक अद्याप निश्चित झालेला नाही. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय बैठका आणि नियमित दूरध्वनी संभाषण यांद्वारे नियमित राजनैतिक संपर्क राखला आहे.