DMK Corruption : तमिळनाडूचे विद्यमान शिक्षणमंत्री तथा द्रमुकचे नेते पोनमुडी आणि त्यांची पत्नी यांना ३ वर्षांचा कारावास !

आता पोनमुडी सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही, तर पोनमुडी यांना आमदारकी आणि मंत्रीपद गमवावे लागेल.

जमावाकडून होणार्‍या हत्येसाठी आता फाशीची शिक्षा होणार !

सरकारने ३ कायद्यांमध्ये पालट केले, हे अभिनंदनीय आहे. ब्रिटीशकालीन कायदे पालटण्यासाठी देशाला ७५ वर्षे लागणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

पोप फ्रान्सिस यांचे माजी सल्लागार कार्डिनल एंजेलो बिसीयू यांना साडेपाच वर्षांचा कारावास

जगभरात चर्च आणि त्यात कार्यरत असलेल्या पाद्य्रांनी केलेल्या अनाचाराचे नवनवीन किस्से समोर येत आहेत. अशातच ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुुरु असलेल्या पोपच्या आजूबाजूला असणारा गोतावळाही भ्रष्ट आहे, हे या घटनेमुळे समोर आले.

मध्यप्रदेशात भोंग्यांनंतर आता उघड्यावर विनाअनुमती मांस विक्रीवर बंदी !

आतापर्यंत असे का होत होते आणि प्रशासन त्याकडे दुर्लक्ष का करत होते ? याची चौकशी झाली पाहिजे !

खटला प्रलंबित असतांना अंमलबजावणी संचालनालयाने आरोपीला वर्षानुवर्षे कोठडीत ठेवणे, हा अन्याय !

राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण केले आहे. वर्षानुवर्षे नजरकैदेत ठेवल्याने आरोपीचे वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखे आहे.

जलद गती विशेष न्यायालयांमध्ये ‘पोक्सो’ची २ लाख ४३ सहस्र प्रकरणे प्रलंबित

जलद गती न्यायालयांतील केवळ एका कायद्याच्या संदर्भात इतकी प्रकरणे प्रलंबित असतील, तर अन्य प्रकरणांच्या प्रलंबित खटल्यांची कल्पनाच करता येत नाही. जलद गती न्यायालयांची ही स्थिती असेल, तर भारतात तत्परतेने न्याय मिळणे  कठीण आहे, हेच लक्षात येते !

संपादकीय : सुखावणारी शिक्षा !

हिंदूबहुल भारतात प्राचीन धर्म असणार्‍या आणि कोट्यवधी लोक ज्या धर्माचे पालन करतात, तो धर्म नष्ट करण्याची भाषा केली जाते आणि ती करणार्‍याच्या विरोधात काहीही कारवाई होत नाही, ही हिंदूंची शोकांतिकाच ! या पार्श्वभूमीवर अन्सारी याला ५ वर्षांनी थोडीशी का होईना, शिक्षा झाली, हे महत्त्वाचे !

Police Stabbed : एका कैद्याने कृष्णवर्णियाची हत्या करणार्‍या पोलिसाला कारागृहात २२ वेळा भोसकले !

अ‍ॅरिझोना येथील टक्सन कारागृहात शिक्षा भोगत असलेले माजी पोलीस अधिकारी डेरेक चौविन यांच्यावर एका कैद्याने जीवघेणे आक्रमण केले. जॉन टर्सकन या ५२ वर्षीय कैद्याने चौविन यांना २२ वेळा चाकूने भोसकले.

फाशीच्या शिक्षेतून कतारमधील भारतियांना वाचवण्यासाठी भारताचे प्रयत्न !

‘काही वर्षांपासून भारताचे माजी नौदल अधिकारी हे कतारच्या करागृहात आहेत. त्यांना अलीकडेच कतारने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

खोटे किंवा सूड उगवण्यासाठी बलात्कारांच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने पीडितेचा जबाब, हा मोठा पुरावा होऊ शकत नाही ! – कोलकाता उच्च न्यायालय

बलात्काराच्या प्रकरणात पीडित महिलेचा जबाब, हा मोठा पुरावा होऊ शकत नाही; कारण अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जेथे पीडितेने खोटे किंवा सूड उगवण्याच्या उद्देशाने बलात्कार झाल्याची तक्रार प्रविष्ट केली, असे कोलकाता उच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करतांना सांगितले.