पोप फ्रान्सिस यांचे माजी सल्लागार कार्डिनल एंजेलो बिसीयू यांना साडेपाच वर्षांचा कारावास

मालमत्तेच्या विक्रीमध्ये घोटाळा

(कार्डिनल म्हणजे चर्चमधील वरिष्ठ धर्मगुुरु)

कार्डिनल एंजेलो बिसीयू

लंडन (ब्रिटन) – येथील एका न्यायालयाने ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे माजी सल्लागार कार्डिनल एंजेलो बिसीयू यांना साडेपाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. लंडनमधील एका मालमत्तेच्या विक्रीमध्ये घोट्याळा केल्याच्या प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली.

सौजन्य विऑन 

(जगभरात चर्च आणि त्यात कार्यरत असलेल्या पाद्य्रांनी केलेल्या अनाचाराचे नवनवीन किस्से समोर येत आहेत. अशातच ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुुरु असलेल्या पोपच्या आजूबाजूला असणारा गोतावळाही भ्रष्ट आहे, हे या घटनेमुळे समोर आले. त्यामुळे जगाला प्रेम आणि शांती यांचा फुकाचा सल्ला देणार्‍या पोप यांनी प्रथम स्वतःच्या सहकार्‍यांना नीतीमत्तेचे धडे द्यावेत ! – संपादक) त्यांच्यासमवेत अन्य १० जणांनाही शिक्षा सुनावण्यात आली. कार्डिनल एंजेलो एकेकाळी पोप फ्रान्सिस यांचे सर्वांत जवळचे आणि विश्‍वासू कार्डिनल होते.