पुणे येथे २ नवीन मेट्रो मार्ग चालू होणार !

पुणे – मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुण्यासाठी २ नवीन मेट्रो मार्गांना अनुमती देण्यात आली. राज्याचा अकरावा अर्थसंकल्प १० मार्च या दिवशी सादर झाला. त्या वेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली. या मार्गासाठी ९ सहस्र ८९७ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी आणि नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग या २ मार्गिकांसाठी हा प्रस्ताव देण्यात आला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकार काही नव्या मेट्रो मार्गाचे बांधकाम करणार आहे. ३३.१ कि.मी.च्या या २ मार्गांवर ३० स्थानके, ५ भूमीगत स्थानके, २५ कार्यरत स्थानके आहेत.