पुणे येथील डी.वाय. पाटील महाविद्यालयात विस्फोटक ठेवल्याचा ई-मेल !

पडताळणीनंतर ई-मेल खोटा असल्याचे निष्पन्न

पिंपरी (पुणे) – आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आर्.डी.एक्स. विस्फोटक ठेवले असून संपूर्ण महाविद्यालय उडवून देणार, असा ई-मेल महाविद्यालय प्रशासनाला मिळाला. तातडीने त्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांना देण्यात आली. बाँबशोधक/नाशक पथक आणि श्वानपथक यांच्या साहाय्याने महाविद्यालयाची कसून झडती घेतली; मात्र ५ ते ६ घंटे तपास केल्यानंतर हा मेल पूर्णपणे खोटा असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार आहे.

बाँब ठेवल्याचा ई-मेल मिळताच पोलिसांनी तात्काळ संपूर्ण महाविद्यालय रिकामे करण्याचे आदेश दिले आणि सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढून पडताळणी केली. परिसरात अफवांना उधाण आले. त्यामुळे पालकांनीही घाईघाईने महाविद्यालयाकडे धाव घेतली.