‘श्रीशैलम् भ्रमराम्बिका मल्लिकार्जुन स्वामी मंदिरा’च्या परिसरात अन्य धर्मियांना दुकाने लावता येणार नाहीत !

हिंदु जनजागृती समितीचे श्री. चेतन गाडी म्हणाले की, श्रीशैलम् हे तीर्थक्षेत्र १८ शक्तिपिठांपैकी एक आणि १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. इतक्या पवित्र तीर्थक्षेत्री अन्य धर्मियांचा प्रभाव असणे, ही अतिशय दु:खद गोष्ट आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट आणि नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त ! – वासुदेव काळे, प्रदेशाध्यक्ष, किसान मोर्चा

‘‘सरकारने गेल्या २ वर्षांत राज्यातील अतीवृष्टी, महापूर, चक्रीवादळ यांचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांना किरकोळ साहाय्य करत शेतकर्‍यांची क्रूर चेष्टा केली आहे.

माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडून ९४० कोटी रुपयांची रामनगर साखर कारखान्याची भूमी हडपण्याचा प्रयत्न ! – किरीट सोमय्या, नेते, भाजप

माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना येथील साखर कारखानाच्या खरेदीत अपव्यवहार केला आहे, या प्रकरणी ईडी’कडून चौकशी चालू आहे – किरीट सोमय्या

हिंदुत्वनिष्ठ संघटनेशी संबंधित लोकांनाच जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

राजकीय दबावाखाली पोलीस एकांगी कारवाई करत आहेत. १२ नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या हिंसाचाराविषयी सरकार मूग गिळून गप्प का बसले आहे ?, असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

लोकमान्य टिळक यांचे रत्नागिरी येथील जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करा ! – हिंदु जनजागृती समिती

देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे आयुष्य वेचणार्‍या क्रांतीकारकांचा विसर पडणे, हे सरकारी यंत्रणा कृतघ्न असल्याचेच द्योतक ! ही स्थिती त्यांना लज्जास्पद ! आता जनतेनेच क्रांतीकारकांची स्मारके सुस्थितीत ठेवण्यासाठी सरकारकडे आग्रह धरावा !

कंगना राणावत काहीच चुकीचे बोलली नाही, हे माझे मत मी पालटणार नाही ! – विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेते

माझे भाषण माध्यमांनी पूर्ण दाखवले नाही. माध्यमांनी माझ्या भाषणाचा विपर्यास केला; पण मी माझ्या मतांवर ठाम आहे. १८ मे २०१४ या दिवशी खर्‍या अर्थाने देशाने जागतिक पटलावर उभे रहायला प्रारंभ केला.

(म्हणे), ‘मुस्लिम आरक्षणासाठी समाजाने रस्त्यावर उतरावे का ?’ – असदुद्दीन ओवैसी, खासदार, एम्.आय.एम्.

मुसलमानांची सामाजिक आणि आर्थिक दुर्बलता न्यायालयाने मान्य केली आहे, तर अडचण काय आहे ? आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला. आता आम्हीही (मुसलमानांनी) रस्त्यावर उतरावे का ? तुम्हालाही तेच हवे आहे का ?’,- खासदार ओवैसी

जातीयवादी शक्ती परिस्थितीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत ! – शरद पवार

‘‘ज्यांना सत्ता मिळाली, त्यांनी या सत्तेचा अपवापर कसा केला, हे जनतेने पाहिले आहे. सत्ता मिळत नसल्याने नैराश्यातून भाजप महाविकास आघाडीवर आरोप करत आहे. त्याला फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही.

नवाब मलिक यांनी आरोप सिद्ध न केल्यास दावा ठोकणार ! – अनिल बोंडे

मलिक यांच्या या आरोपानंतर भाजपचे नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी म्हटले की, नवाब मलिक यांनी आरोप सिद्ध करून न दाखवल्यास त्यांच्यावर येथील न्यायालयात अब्रूहानीचा दावा प्रविष्ट करण्यात येईल.