नीरा नदी दूषित करणार्‍यांवर कठोर कारवाई करणार ! – प्रल्‍हाद सिंह पटेल

पटेल यांनी सोनगाव येथील सोनेश्‍वराचे दर्शन घेतले, तसेच नीरा नदीची पहाणी केली. या वेळी नदीची सगळ्‍यात अधिक हानी पशूवधगृहामुळे झाली आहे. नीरा नदी दूषित करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी त्‍यांनी प्रदूषण करणार्‍यांना दिली आहे.

निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण मंडळाचे काम हे पर्यावरणीय प्रबोधनाच्या चळवळीतील एक साधन ! – लेखक धीरज वाटेकर

पर्यावरणाच्या दृष्टीने काळ मोठा कठीण आला आहे. समाजसुधारणांच्या सर्वच क्षेत्रात असलेली अनास्था न्यून करण्यासाठी आपण सातत्याने लोकांसमोर विविधांगाने विषयाची मांडणी करत राहिले पाहिजे.

मानवी जीवन वाचवण्‍यासाठी पृथ्‍वीचे संरक्षण आवश्‍यक !

आज नैसर्गिक साधनसंपत्तीच्‍या संवर्धनाकडे विशेष लक्ष देण्‍याची आवश्‍यकता आहे. ज्‍यात प्रामुख्‍याने सूर्यप्रकाश, खनिजे, वनस्‍पती, हवा, पाणी, वातावरण, भूमी आणि प्राणी इत्‍यादींचा समावेश होतो. या संसाधनांचा बिनदिक्‍कतपणे दुरुपयोग होत आहे.

रसायनयुक्‍त सांडपाण्‍यातच आळंदी येथे वारकर्‍यांना करावे लागणार तीर्थस्नान !

संतभूमी असलेल्‍या महाराष्‍ट्रात असे होणे, याहून दुसरे दुर्दैव कोणते ? रसायनयुक्‍त सांडपाणी सोडणार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्‍यक आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ८९ गावांचे सांडपाणी प्रक्रिया न करता थेट पंचगंगा नदीत मिसळते ! – जिल्हा परिषद, कोल्हापूर

पंचगंगेचे प्रदूषण अल्प करण्याविषयीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या वतीने प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर करण्यात आला आहे. यात ८९ गावांचे सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हा अहवाल प्रदूषण मंडळाकडून मुख्य सचिवांना पाठवण्यात येणार असून मुख्य सचिव हा अहवाल हरित लवादाला सादर करणार आहेत.

नाकर्तेपणावर मलमपट्टी 

सध्या ‘इकोफ्रेंडली’ गणेशोत्सवाच्या नावाने जो बागूलबुवा सिद्ध केला जात आहे, यावरून ‘जे जलप्रदूषण होते, ते जणू काही गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळेच होते’, असे चित्र निर्माण केले जात आहे.

मुंबईची हवा श्‍वास घेण्‍याच्‍या योग्‍यतेची नाही ! – प्रजा फाऊंडेशन

मुंबई शहराची हवा श्‍वास घेण्‍याच्‍या योग्‍यतेची नाही, याविषयीच्‍या अनेक तक्रारी मुंबई महापालिकेकडे करण्‍यात आलेल्‍या आहेत.

मुंबईमध्ये घरगुती गणेशमूर्ती शाडूच्या मातीच्याच !

शाडूची माती ही नैसर्गिक असल्यामुळे त्यापासून सिद्ध केलेल्या मूर्तीमुळे कोणत्याही प्रकारे प्रदूषण होत नाही. याउलट कागदी लगद्यापासून सिद्ध केलेल्या मूर्तीमुळे प्रदूषण होते. त्यामुळे शाडूच्या मातीची गणेशमूर्ती पर्यावरणपूरक आहेत.

रत्नागिरीत इलेक्ट्रिक एस्.टी. धावणार !  – विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे

सी.एन्.जी. गाड्यांसमवेत आता रत्नागिरी विभागात ४ ठिकाणी इलेक्ट्रिक गाड्याही येणार आहेत. या गाड्यांसाठी ‘इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन’ची जागासुद्धा निश्चित करण्यात येत आहेत. पुढील ४ मासांत या गाड्या येथे येतील .

येत्या ८ दिवसांत एस्.टी. महामंडळाच्या ताफ्यात येणार ५० इलेक्ट्रिक शिवाई बस !

इंधनावरील खर्च आणि प्रदूषण अल्प करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांना केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. त्याअंतर्गत लवकरच एस्.टी. महामंडळाच्या ताफ्यात ५० इलेक्ट्रिक शिवाई बस दाखल होणार आहेत.