खापरखेडा औष्‍णिक वीज केंद्र (नागपूर) येथील राखेचा बंधारा फुटल्‍याने शेतात चिखल !

बंधार्‍यातून बाहेर निघालेली राख आणि चिखल अनेक शेतकर्‍यांच्‍या शेतात पसरला आहे. त्‍यामुळे नुकतीच पेरणी केलेल्‍या शेतकर्‍यांचीही पुष्‍कळ आर्थिक हानी झाली आहे. 

मूर्तीकारांना नि:शुल्क जागा आणि घरगुती स्तरावर शाडूच्या मूर्तीचे बंधन !

मूर्ती शाडूची मातीची असल्यास त्यातून प्रदूषणही होत नाही. त्यामुळे प्रशासनाने उत्सव धर्मशास्त्रानुसार साजरे करण्याची भूमिका घ्यावी !

‘हरित हायड्रोजन’चेे धोरण घोषित करणारे महाराष्‍ट्र देशातील पहिले राज्‍य, मंत्रीमंडळाची मान्‍यता !

४ जुलै या दिवशी झालेल्‍या राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत या प्रकल्‍पाला मान्‍यता देण्‍यात आली असून त्‍यासाठी ८ सहस्र ५६२ कोटी रुपये इतका निधी संमत करण्‍यात आला आहे.

आषाढी एकादशी असल्याने ‘बकरी ईद’निमित्त गोवंशियांची, तसेच अन्य पशूंची सार्वजनिक ठिकाणी होणारी हत्या रोखा !

वास्तविक अशी मागणी करण्याची वेळ हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर येऊ नये. सरकारने स्वतःहून गोवंशियांची हत्या रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवणे आवश्यक आहे !

छत्रपती संभाजीनगर येथील १ सहस्र ५६८ कारखान्‍यांतील विषारी पाणी थेट नाल्‍यांत !

यामुळे भूमीतील जलस्रोत दूषित होत आहेत. याकडे महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्‍याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

यंदा गणेशचतुर्थीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना थारा नाही ! – प्रवीण आर्लेकर, अध्यक्ष, गोवा हस्तकला महामंडळ

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. यामुळे या मूर्तींचे विडंबन होते आणि पर्यावरणाचीही हानी होते. यामुळे अशा गणेशमूर्तींची विक्री रोखण्यासाठी हस्तकला महामंडळ प्रयत्नशील रहाणार आहे.

रत्नागिरी नगर परिषदेचा पहिला क्रमांक  : १ कोटी ५० लाख रुपयांचे मिळाले पारितोषिक !

शासनाकडून गेल्या वर्षी माझी वसुंधरा अभियान ३.० राबवण्यात आले. या अभियानामध्ये पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वअंतर्गत केलेल्या कामाचे मूल्यांकन करण्यात आले.

तिवरे (तालुका चिपळूण) गावात बीजारोपण आणि रोपवाटिका निर्मितीसाठी ५० सहस्र बीजप्रदान  !

विविध कारणांनी ब्रिटीशांच्या काळात देवरायांची, जंगलांची अधिकची तोड चालू झाली, ती आजही चालू आहे. तिचे परिणाम आपण अनुभवतो आहोत. म्हणून देशी जंगली वृक्षांचे बीजारोपण आणि वृक्षारोपण काळाची आवश्यकता आहे.

रसायनमिश्रित पाणी सोडल्यामुळे विहिरीमध्ये आढळले मृत मासे !

अशी मागणी जनतेला पुन:पुन्हा का करावी लागते ? खरेतर प्रदूषण नियंत्रण मंडळानेच या समस्येवर ठोस उपाययोजना काढायला हवी !

विदेशी नको देशी झाडेच लावा !

देशी झाडांच्‍या लागवडीविषयी माहिती घेऊन प्रत्‍येक नागरिकाने पुढाकार घेऊन देशी अशा झाडांचे वृक्षारोपण केले पाहिजे आणि पर्यावरण वाचवण्‍यात हातभार लावला पाहिजे ! तसेच सरकारच्‍या संबंधित विभागांना विदेशी झाडे लावण्‍यापासून परावृत्त करूया !