मुंबईकरांनी एका दिवसात १५० कोटी रुपयांचे फटाके फोडले !

मुंबई – येथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एकट्या मुंबई शहरात १५० कोटी रुपयांचे फटाके फोडण्यात आले. त्यामुळे येथील हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली आहे. ती २८८ इतकी झाली आहे. फटाके फोडण्याचे हे प्रमाण इतर दिवसांपेक्षा ५० टक्के अधिक होते.

संपादकीय भूमिका

फटाक्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करून प्रदूषण वाढवण्यापेक्षा त्या पैशांचा राष्ट्र-धर्म कार्यासाठी विनियोग करावा !