Chhath Pooja : बंदीच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास देहली उच्च न्यायालयाचा नकार  

प्रदूषणामुळे यमुना नदीच्या किनारी छठ पूजा करण्यावरील बंदीचे प्रकरण

नवी देहली – देहली उच्च न्यायालयाने यमुना नदीच्या किनारी छठ पूजा करण्याची अनुमती मागणार्‍या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला. छठपूजा संघर्ष समिती आणि  पूर्वांचल जागृती मंच यांनी ही याचिका प्रविष्ट केली होती. ९ ऑक्टोबर २०२१ या दिवशी देहली सरकारने अधिसूचना प्रसारित करून यमुना नदीच्या किनारी छठ पूजा करण्यावर बंदी घातली होती. या बंदीच्या विरोधात या संघटनांनी याचिका प्रविष्ट केली होती. याचिकेत म्हटले होते की, अशा प्रकारची बंदी घालणे, हे लोकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. यामुळे देहलीत रहाणार्‍या ३० ते ४० लाख भाविकांना फटका बसणार आहे. यावर ‘नदीचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी तेथे बंदी घालण्यात आलेली आहे’, असे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. (पूजेमुळे खरेच प्रदूषण होते का ? आणि होत असेल, त्याचे प्रमाण अन्य प्रदूषणकारी गोष्टींच्या तुलनेत किती आहे ? याचा अभ्यास सरकारने केला होता का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

छठ पुजेमुळे नाही, तर कारखान्यांचे रासायनिक पदार्थ, तसेच अन्य प्रदूषणकारी कचरा नदीत सोडण्यात येत असल्यामुळेच यमुना नदीची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. त्यावर उपाय काढण्याऐवजी पूजेवर बंदी घालणारे देहलीचे आम आदमी पक्षाचे सरकार जनताद्रोही आणि हिंदुद्रोहीच होत !