राज्‍यातील हवामानात सातत्‍याने पालट !

अरबी समुद्रात अल्‍प दाबाचा पट्टा सिद्ध झाल्‍यामुळे वातावरणात सातत्‍याने पालट होत आहेत. दिवसभर ऊन असते, तर पहाटे आणि रात्री थंडीचे प्रमाण वाढते. काही जिल्‍ह्यांमध्‍ये पाऊस पडण्‍याची शक्‍यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

वाढते प्रदूषण रोखण्‍यासाठी राज्‍य सरकारकडून उपाययोजना !

राज्‍यात अनेक शहरांमध्‍ये प्रदूषणाची पातळी वाढल्‍याने नागरिकांच्‍या आरोग्‍याला धोका निर्माण झाला आहे. नागरिकांचे आरोग्‍य जपण्‍यासाठी पुढील उपाययोजना चालू केल्‍या आहेत

आता सहन करण्याच्या पलीकडे गेले असून आम्ही बुलडोजर चालवण्यास प्रारंभ केला, तर थांबणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

गेंड्याच्या कातडीच्या सरकारांवर अशा फटकारण्याचा काहीच परिणाम होणार नाही आणि जनतेला जीवघेण्या प्रदूषणाला प्रतिवर्षी सामोरे जावे लागणार. त्यामुळे न्यायालयाने स्वतः यावर जातीने लक्ष देऊन प्रदूषण संपवण्यासाठी प्रयत्न करावेत, असेच जनतेला वाटते !

दिवाळीत फटाके फोडणे टाळा आणि मास्क वापरा !  

राज्यात वायूप्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने आरोग्य विभागाकडून नियमावली घोषित करण्यात आली आहे. राज्यातील १७ मुख्य शहरांमध्ये प्रदूषणामुळे आजारांचा धोका वाढला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने दक्षता घेण्याची सूचना केली आहे.

हवा प्रदूषित करणार्‍या बांधकाम विकासकांवर महापालिकेकडून कारवाई !

महापालिकेने धूळशमन यंत्राद्वारे (‘एअर प्युरिफाय मोबाईल व्हॅन’) हवेतील धुळीचे प्रमाण अल्प करण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच काही मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत

देहली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर !

चांगल्या गोष्टींसाठी नाही, तर वाईट गोष्टींसाठीच भारताची राजधानी सर्वांत पुढे असते, हे लज्जास्पद ! याला सर्वपक्षीय शासनकर्ते, प्रशासन आणि जनता उत्तरदायी आहे !

मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील रस्ते धुण्यास प्रारंभ !

मुंबई उच्च न्यायालयाने हवेच्या प्रदूषणावरून फटकारले या पार्श्‍वभूमीवर मुंबई महानगरात ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे स्वच्छ करण्यात येतील हा निर्णय घेण्यात आला.

देहली आणि त्याच्या शेजारील भागांतील वायूचे प्रदूषण ५ पटींनी वाढले !

राजधानी देहलीत प्रतिवर्षी या काळात वायू प्रदूषणात वाढ होते, हे सर्वपक्षियांना ठाऊक असूनही ते प्रदूषण दूर करण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करत नाहीत आणि जनताही त्यांना याविषयी जाब विचारत नाही, ही स्थिती लज्जास्पद आहे !

३५० बसगाड्यांवर हवा शुद्धीकरण यंत्रे बसवणार !

‘वायू’ या आस्थापनाने सिद्ध केलेले पदपथावरील दिवे ५० ठिकाणी कार्यान्वित केले जाणार असून त्यातही हवा शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यात आली आहे. चेंबूर येथील डायमंड गार्डन, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान येथे हे दिवे बसवले जातील.