बंगालमध्ये दिवाळीत फटाके वाजवण्यावरील बंदीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

कोलकाता उच्च न्यायालयाने कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर काली पूजा, दिवाळी आणि छट पूजेच्या वेळी बंगालमध्ये सर्व प्रकारचे फटाके फोडण्यावर एका जनहित याचिकेवर सुनावणी करतांना बंदी घालण्याचा आदेश दिला होता.

मोठ्या शहरांमधील असुरक्षित वातावरण, तसेच तेथे वाढत चाललेले रज-तमाचे प्राबल्य यांमुळे कुटुंबियांसह गावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचा विचार करा आणि तेथे रहाण्याची व्यवस्था करून ठेवा !

शहरांमधील बेसुमार गर्दी, स्वच्छतेचा अभाव, वाढते प्रदूषण, रज-तम यांचे अधिक प्राबल्य आदींमुळे तेथील नागरिक भीती आणि असुरक्षितता यांच्या सावटाखाली वावरतांना दिसत आहेत. युद्धजन्य परिस्थिती, दंगली, त्सुनामी, रोगराई आदी आपत्तींच्या वेळी ही शहरे गावापेक्षा अधिक संकटात असू शकतात. त्यामुळे तेथे रहाणे धोक्याचे ठरू शकते.

देहलीत संचारबंदी केल्यामुळे प्रदूषणात कमालीची घट

कोरोनाचा असाही परिणाम ! आता देहलीतील नागरिक काही दिवस तरी स्वच्छ हवा अनुभवतील !