कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याची अफवा पसरवणार्यास पोलिसांनी घेतले कह्यात
कोरोना विषाणूच्या संदर्भात ‘व्हॉट्सअॅप’वर ध्वनीमुद्रित क्लिप सिद्ध करून अफवा पसरवणार्या एका संशयित व्यक्तीस येथील पोलिसांनी २६ मार्च या दिवशी कह्यात घेतले आहे…
कोरोना विषाणूच्या संदर्भात ‘व्हॉट्सअॅप’वर ध्वनीमुद्रित क्लिप सिद्ध करून अफवा पसरवणार्या एका संशयित व्यक्तीस येथील पोलिसांनी २६ मार्च या दिवशी कह्यात घेतले आहे…
शहरातील तारकपूर परिसरात असलेल्या सिंग रेसिडेन्सी उपाहारगृह येथे २४ मार्च या दिवशी ईराज रेझई (वय ४८ वर्षे) या नावाची इराणी व्यक्ती स्वत:ची ओळख लपवून ६ घंटे राहून निघून गेली…….
देशात दळणवळण बंदी असतांना आणि त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा बंद असतांना मुंबईतील प्रवाशांना समुद्रमार्गे गुहागरमध्ये आणणार्या बोट मालकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी ही माहिती दिली आहे.
स्वतःच्या आणि जनतेच्या आरोग्याशी खेळणार्या अशा जनताद्रोह्यांवर केवळ गुन्हा नोंद न करता सरकारने त्यांना तात्काळ अटक करून आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !
दळणवळण बंदी असतांनाही येथे चारचाकी वाहनातून फिरणारे पिता-पुत्र यांना हटकणार्या पोलिसाला त्या दोघांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. धनसिंह आणि त्यांचा मुलगा उमेश सिंह यांना एका पोलिसाने अडवून प्रश्न विचारल्यावर त्यांच्यात वाद झाला
जनहो, स्वयंशिस्त पाळा ! पोलीस-प्रशासनाचा वेळ छोट्या छोट्या गोष्टींसाठी वाया घालवू नका !
येथील एम्.आय.एम्.चे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या समर्थकाने येथील सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठाता आधुनिक वैद्य किशोर डांगे यांना धक्काबुक्की केली आणि वैद्यकीय कर्मचारी मयूर जाधव यांना मारहाण केली.
कोरोनाबाधितांना ठेवलेल्या विलगीकरण कक्षामध्ये (आयसोलेशन वॉर्डमध्ये) डॉक्टर आणि परिचारिका यांना रुग्णांकडून सहकार्य केले जात नसल्याचेही समोर येत आहे.
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी कर्तव्य बजावणारे पोलीस, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरील आक्रमणाच्या घटना कदापि सहन केल्या जाणार नाहीत. अशी आक्रमणे करणार्यांवर गुन्हे नोंदवून कायदेशीर कारवाई केली जाईल
‘तुम्ही काही दिवसांपूर्वी तपासणी केलेल्या रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तुम्ही पुढचे १४ दिवस ‘होम क्वारंटाईन’ व्हा आणि औषधे घ्या’, असे सांगत एका व्यक्तीने एका नामांकित रुग्णालयातील आधुनिक वैद्यांना २१ मार्चला भ्रमणभाषद्वारे संपर्क साधला.