राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणार्‍या १४ घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना अटक

सीमेवर सैन्य आणि सीमा सुरक्षा दल कार्यरत असतांना बांगलादेशी अन् रोहिंग्या घुसखोर मुसलमान घुसखोरी कशी करू शकतात ?

(प्रतिकात्मक चित्र)

किशनगंज (बिहार) – येथे राजधानी एक्सप्रेस या रेल्वे गाडीतून प्रवास करणार्‍या १४ घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना अटक करण्यात आली आहे. हे घुसखोर बांगलादेशातील शरणार्थी तळावरून पळून आले आहेत.

यामध्ये ८ महिला आणि २ मुले यांचाही समावेश आहे. दुसरीकडे आसामच्या अलगापूर येथून ८ रोहिंग्यांना अटक करण्यात आली आहे.