अल्ट्राटेक सिमेंट, रत्नागिरीच्या वतीने पोलिसांना पाणी वाटप
कोरोना विषाणूमुळे जागतिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी दिवस-रात्र जनतेचे रक्षक पोलीस साहाय्य करत आहेत.
कोरोना विषाणूमुळे जागतिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी दिवस-रात्र जनतेचे रक्षक पोलीस साहाय्य करत आहेत.
जनता आपत्काळात दिलेल्या सूचना गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे अशी चेतावणी द्यावी लागते, हे जनतेला लज्जास्पद ! या संकटावर मात करण्यासाठी शासकीय आदेशांचे पालन करणे अपरिहार्य आहे.
देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दळणवळणबंदी घोषित करण्यात आली आहे. असे असतांना अनेक नागरिक शासनाने दिलेल्या सूचना धुडकावून लावत रस्त्यावर फिरत आहेत. यावर उत्तरप्रदेश पोलिसांकडून ‘लॉकडाऊन’चे पालन न करणार्यांच्या विरोधात सामाजिकदृष्ट्या लाज वाटेल
येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘गर्दी करू नका, एकत्र येऊ नका’, असे आवाहन करत असलेल्या पोलिसांवरच २ तरुणांनी आक्रमण केले. त्रिमूर्ती चौकात पोलिसांनी तरुणांच्या जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांतील अमोल कुटे आणि संतोष कुटे यांनी पोलिसांशी हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ केली.
संचारबंदीला ९० टक्के जनतेचे सहकार्य मिळाले आहे; मात्र काही लोकांना परिस्थितीचे गांभीर्य नाही. जे सहकार्य करणार नाहीत, त्यांच्यावर लाठीचा उपयोग करण्यात येईल, अशी चेतावणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
खासगी वाहनांच्या बंदी आदेशाविषयी माहिती देणार्या एका महिला पोलीस कर्मचार्याशी धक्काबुक्की करून त्यांना खाली पाडल्याची घटना लांजा येथे घडली.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचे उल्लंघन करणार्या ३८ जणांवर २२ आणि २३ मार्च या दिवसांमध्ये फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला. विनाकारण फिरणार्यांना पोलिसांकडून चोप दिला जात आहे.
विदेश दौर्याची माहिती लपवल्याच्या प्रकरणी येथील धामणगाव परिसरात रहाणार्या एका ६५ वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी येथील ग्रामसेवक पंजाबराव मोरे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून राज्यात १४४ कलमान्वये संचारबंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. असे असतांना या आदेशाचे उल्लंघन करणार्या शहरातील ११२ जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत.
मित्रासमवेत दुचाकीवरून कुही येथे जाणार्या युवतीवर सामूहिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रस्त्यात दुचाकी बंद पडली असता तेथे आलेल्या ५ जणांपैकी तिघांनी युवतीवर सामूहिक अत्याचार केले.