बी.एच्.आर्. पतसंस्था घोटाळ्याच्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पथकाच्या धाडी

पुणे – ठेवीदारांची फसवणूक करत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी भाईचंद हिराचंद रायसोनी (बी.एच्.आर्.) या पतसंस्थेच्या संचालकांच्या घरी, तसेच जळगाव आणि संभाजीनगर येथील संचालकांच्या घरी २७ नोव्हेंबर या दिवशी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडी टाकल्या आहेत.

पुणे पोलीस, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलीस यांंच्या तीन पथकांकडून जळगाव आणि संभाजीनगर येथे धाडी घालण्यात आल्या. पुणे पोलीस, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण पोलीस यांकडे या घोटाळ्याप्रकरणी ३ गुन्हे नोंद आहेत. त्यादृष्टीने पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या जळगावातील शिवाजीनगर येथील घरी धाड टाकण्यात आली. रात्री विलंबापर्यंत ही कारवाई चालू होती, असे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.