देशाप्रमाणे महाराष्ट्रातही सहस्रो हिंदु युवती आणि स्त्रिया लव्ह जिहादला बळी पडल्या आहेत. याचे कित्येक पुरावे व्हिडिओच्या माध्यमातून आणि पोलीस ठाण्यांमधून सहज उपलब्ध आहेत. गेल्या १५ वर्षांतील त्यांची खरी संख्या समोर आणायची ठरवले तर ती सहस्रोंच्या घरात निश्चित जाईल. हिंदूंचा वंशविच्छेद करणार्या या षड्यंत्राचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्रातही लव्ह जिहादच्या विरोधात तत्परतेने कडक कायदा व्हायला हवा !
मुंबई, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – महाराष्ट्रातील सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संतुलन राखण्यासाठी, तसेच विश्वासघातकी लोकांपासून मुली आणि महिला यांचे रक्षण व्हावे, यासाठी महाराष्ट्रात लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करून देशापुढे एक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन भाजपचे नेते राज पुरोहित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. याविषयी राज पुरोहित यांनी २६ नोव्हेंबर या दिवशी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.
राज पुरोहित यांनी या पत्रात लिहिले आहे, ‘उत्तरप्रदेश येथे योगीशासनाने ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात नुकताच अध्यादेश पारित केला आहे. देश, समाज आणि महिला यांच्या हितासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातही स्थिती गंभीर आहे. येत्या काळात महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या घटना वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि प्रशासन यांनाही ‘लव्ह जिहाद’ विषयी कठोर निर्णय घ्यायला हवा.’