|

नवी देहली – म.फि. हुसेन यांच्या कथित आक्षेपार्ह चित्रांवर आक्षेप घेणार्या एका व्यक्तीची चिंता संपूर्ण हिंदु समाजाची चिंता असू शकत नाही, असा फुकाचा युक्तीवाद दिल्ली आर्ट गॅलरीचे अधिवक्ता मकरंद आडकर यांनी देहली उच्च न्यायालयात केला. या कला दालनात काही महिन्यांपूर्वी म.फि. हुसेन यांनी रेखाटलेल्या हिंदूंच्या देवतांच्या आक्षेपार्ह चित्रांच्या प्रदर्शनाच्या विरोधात अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी याचिका प्रविष्ट (दाखल) करून कला दालनावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती. त्यावरील सुनावणीच्या वेळी कला दालनाचे अधिवक्ता युक्तीवाद करत होते.
Delhi Art Gallery(DAG)'s , shocking justification for displaying M.F. Husain’s controversial art:
"An individual Hindu’s concern is not the collective concern of Hindu society."
DAG, which is showcasing paintings by Hindu-hater M.F. Husain — known for his derogatory depictions… https://t.co/jWzmiwFb3s pic.twitter.com/MtvEGDQDj1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 5, 2025
अधिवक्ता आडकर यांनी युक्तीवादात दावा केला की,
१. १. कला दलनातील प्रदर्शनात ३० दिवसांपर्यंत रेखाचित्रे तिथे होती. सहस्रो लोकांनी चित्रे पाहिली. तक्रारदार (अधिवक्त्या अमिता सचदेवा) वगळता कुणीही आक्षेप घेतला नाही. कला समजून घेण्यासाठी तुम्हाला तुमचा मेंदू थोडा मोठा करावा लागेल. (हिंदू सहिष्णु असल्याने असा युक्तीवाद केला जातो. येथे अन्य धर्मियांचा संदर्भ असता, तर युक्तीवाद करणार्यांचा मेंदू शिल्लक राहिला असता का ? – संपादक)
२. हुसेन यांनी यापूर्वीही देवतांच्या नग्न रूपातील चित्रे बनवली होती. त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी होत्या. यावर त्यांच्याकडून कधीही क्षमा मागण्यात आली नव्हती. (हुसेन याने क्षमा मागितली नाही; मात्र त्यांना देश सोडून कतार येथे पळून जावे लागले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला, हाही इतिहास आहे ! – संपादक) सनातन धर्माशी व्यवहार करण्याचा हा मार्ग नाही. (सनातन धर्माच्या श्रद्धास्थानांचा अवमान करण्याचा मार्ग योग्य आहे, असे दिल्ली आर्ट गॅलरीला वाटते का ? – संपादक)
यावर न्यायाधीश दास यांनी विचारले की, कला दालनाच्या मर्यादेत कोणत्याही प्रकारची सेन्सॉरशिप लागू होते का ?
३. अधिवक्ता आडकर यांनी उत्तर दिले की, कोणतेही अश्लील चित्र बनवता येते आणि बॅगेत ठेवता येते; पण ज्या क्षणी ते बॅगेतून बाहेर पडते, ते सार्वजनिक होते, तिथेच समस्या आहे. मी म्हणत आहे की, माझ्या देवांना (हिंदु देवतांना) सोडून द्या. आपण असे समजू शकतो का की, ज्या व्यक्तीने भिंतीवर चित्र लावले त्याला त्याचे परिणाम ठाऊक नव्हते ?
त्यानंतर न्यायाधीश दास यांनी प्रकरण २१ एप्रिलपर्यंत सुनावणी पुढे ढकलली.
काय आहे प्रकरण ?४ डिसेंबर २०२४ या दिवशी देहलीच्या कॅनॉट प्लेस येथे असणार्या दिल्ली आर्ट गॅलरी येथे म.फि. हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्यात आक्षेपार्ह चित्रांचाही समावेश होता. या प्रकरणी अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. याची माहिती मिळताच कला दालनाने आक्षेपार्ह चित्रे प्रदर्शनातून काढून टाकली आणि दावा केला की, ती लावण्यातच आली नव्हती. यानंतर सचदेवा यांनी पटियाला हाऊस न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली. त्यांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला; मात्र आक्षेपार्ह चित्रे जप्त करण्याचा आदेश दिला. देहली उच्च न्यायालयात यावर आव्हान देत गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. |
संपादकीय भूमिका
|